Saturday, July 18, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली नगरपरिषद हद्दीतील पथ दिवे बंद स्वरूपात - नगर परिषदेने दान कर्ते...

गडचिरोली नगरपरिषद हद्दीतील पथ दिवे बंद स्वरूपात – नगर परिषदेने दान कर्ते शोधून लाईट बसवावे; रिपाईचे कार्यकर्ते दान करायला तयार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- नगर परिषद गडचिरोलीच्या मुख्य मार्गांवरील वरील पथ दिवे इंदिरा गांधी चौक,चामोर्शी मार्ग ते शासकिय विज्ञान महाविद्यालया पर्यंतची पथ दिवे गेल्या एक वर्षापासुन बंद अवस्थेत आहेत. अशातच शहरातील नागरिकांना अंधाराचा व इतर त्रासदायक सामना करावा लागत असल्याने गडचिरोली नगर परिषद डबघाईस आली असेल तर रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते मुख्य मार्गांवरील नवीन सुरू पथ दिवे घेऊन देण्याची तयारी रिपाई नेते प्रा.मुनिश्वर बोरकर व इतर कार्यकर्त्यांनी दर्शविली आहे.मागील दोन महिन्यांपूर्वी जिल्हा कॉम्पलेस मार्गावरील पथ दिवे बंद होते.परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या धसक्याने सदर मार्गावरील पथ दिवे सुरु झाले.त्या वेळेस चामोर्शी मार्गावरील सुध्दा बंद दिवे सुरु होतील असा आशा वाद व्यक्त करण्यात आला होता.मात्र अजून पावेतो चामोर्शी मार्गावरील पथ दिवे बंदच अवस्थेत आहेत.रामनवमी,हनुमान जयंती व डॉ. आंबेडकर जयंती सारखे महत्त्वाचे उत्सव असल्याने  नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतो आहे. सदर मार्गावर पहाटे ४ वाजताच्या सुमारास शहरातील नागरिकांची मार्निंग वॉक सुरु होते.परंतु नागरिकांना मुख्य मार्गावरील अंधारामुळे चाचपत-चाचपत वाट शोधून जावे लागते.सदर मार्गांवर तिन लाईटच्या डिप्या असून त्या नादुरूस्त आहेत की काय? नगर परिषदेकडे पैसे नाहीत काय? असा सवाल शहरातील नागरिक करीत आहेत.

नगर परिषदेचे कर्मचारी कर वसुलीसाठी सकाळपासुनच घरोघरी फिरतांना दिसून येतात नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी मार्गावरील बंद स्वरूपातील पथ दिवे त्वरीत दुरुस्तीकडे लक्ष घालावे किंवा पैसे नसतील तर रिपाईचे कार्यकर्ते दान करायला तयार आहोत; अशी खोचक सुचना रिपाईचे नेते प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना विविध अर्थसहाय्य योजनांचा लाभ; प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान,कोलकाता यांच्या समान निधी(Matching Schemes)व असमान निधी(Non-Matching Schemes)योजनांद्वारे राज्यातील शासनमान्य...

रेल्वेची धडक; सहा हरणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या पारशीवनी तालुक्यातील कन्हान नगर परिषद हद्दीच्या तुकाराम नगर नजीकच्या रेल्वे स्टेशन परिसरातील ट्रॅकवर तब्बल सहा हरीण मृतावस्थेत आढळून आल्याची घटना आज,शनिवार...

नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद शाळेत दोन डिजिटल वर्गखोल्यांचे उद्घाटन; प्रत्यक्ष मतदानातून शालेय मंत्रिमंडळाची स्थापना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या नैनपूर वार्ड येथील महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत डिजिटल शिक्षण आणि लोकशाही मूल्यांचा सुंदर संगम अनुभवत आज,शनिवार १८...

शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मिळणाऱ्या मोफत साडी योजनेला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील अंत्योदय अन्न योजनेचा लाभ घेणाऱ्या तब्बल २४ लाख ५८ हजार कुटुंबातील महिलांना दरवर्षी दिवाळीच्या सणात मोफत दिली जाणारी साडी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!