- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-दोन दिवसांपूर्वी रात्री झालेल्या मर्डर मिस्ट्रीचा अखेर उलगडा झाला.एका कार्यक्रमात कुख्यात गुन्हेगार असलेल्या नवऱ्याने पत्नीसोबत अपमानास्पद व्यवहार केल्याने संतप्त झालेल्या पत्नीने ‘तुझा मर्डर करेन तर मीच करेन’, अशी उघड धमकी नवऱ्याला दिली होती.जो कुणी माझ्या नवऱ्याचा गेम करेल त्याला मी एक लाख रुपये देईन,असेही म्हटले आणि ते सत्यात उतरवून हिस्ट्रीशीटर असलेल्या तीन ते चार गुन्हेगारांना एक लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.गणेश उर्फ गुरुदेव बोरकर वय ४५ वर्षे,रा.हनुमाननगर,भांडेवाडी,नागपूर असे धारदार शस्त्रांनी निघृणपणे हत्या झालेल्या कुख्यात गुंडाचे नाव आहे.प्रकरणी मृतकाची ३७ वर्षीय पत्नी मनीषा गणेश उर्फ गुरुदेव बोरकर,पतीच्या हत्येचा कट रचून अभिजित पुरुषोत्तम साखरे वय २९ वर्षे,रोहित बोरकर वय ३० वर्षे आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाच्या मदतीने संगनमत करून हत्या घडवून आणल्याची कबुली दिली.सर्वच आरोपी हार्डकोअर क्रिमिनल असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्यावर हत्या, मारामाऱ्या,हल्ले,घरफोडी सह अनेक गुन्हे दाखल आहेत. मनीषाने दोन आठवड्यांपूर्वी त्यांना सुपारी दिली होती. त्यापैकी स्वतःचे दागिने विकून आरोपींना ५० हजार रुपये दिले आणि बाकी ५० हजार काम झाल्यावर देण्याचे ठरले होते.
- काय आहे घटना?👇
दोन दिवसांपूर्वी म्हणजेच गुरुवार २ जुलै २०२६ रोजीच्या रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास गणेश उर्फ गुरुदेव बोरकर हा हनुमाननगर परिसरातील रेल्वे स्टेशनजवळील चहाच्या दुकानातून घरी परतत होता. त्याच्या हालचालीवर दोघेजण लक्ष ठेवून होते.तर, हनुमाननगरातील चकोले यांच्या घरासमोर दबा धरून बसलेल्या अन्य दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर तिखट फेकले.नंतर झडप घालून धारदार शस्त्रांनी सपासप वार केले.जिवाच्या आकांताने तो ओरडत पळत सुटला आणि मागून मारेकरी त्याचा पाठलाग करीत होते.त्याला रस्त्यावर पाहून आरोपींनी आणखी घाव घातले.त्यामुळे बोरकरचा जागीच मृत्यू झाला.नागपूर जिल्ह्याच्या पारशीवनी तालुक्यातील कन्हान येथील रहिवासी(माहेर) असलेली मनीषा ही पहिल्या नवऱ्यापासून दूर होऊन तब्बल १४ वर्षापूर्वी गणेश बोरकरसोबत वास्तव्यास होती.गणेश बोरकरने दोन विवाह केले होते.त्याला दोन मुली आणि मुलगा आहे. बोरकर सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध विविध पोलिस ठाण्यांत खून,मारामारीसह गंभीर स्वरूपाचे १७ गुन्हे दाखल आहेत.परिसरात त्याची प्रचंड दहशत होती.बाहेरच नव्हे तर तो घरीही स्वस्थ बसत नव्हता. वेगवेगळ्या कारणावरून तो पत्नी आणि मुलांसोबत वाद करून त्यांना मारहाण करायचा. कौटुंबिक वाद,सततची भांडणे आणि तणावामुळे मनीषा मुलांना घेऊन पतीचे घर सोडून श्यामनगर येथे राहायला गेली होती.मात्र,तेथेही तो पत्नी आणि मुलांना सुखी राहू देत नव्हता.त्यामुळे कंटाळलेल्या मनीषाने त्याला काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात धमकी दिली होती.मात्र, बोरकरने त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याचा गेम झाला. याप्रकरणी भांडेवाडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मनीषा आणि एका साथीदाराला अटक केली; तर फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.
- Advertisement -

