Saturday, September 5, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तचारोळी लेखिका तथा कवयित्री लता ढोक सन्मानपत्राद्वारे सन्मानित..- गडचिरोलीत विविध सामाजिक क्षेत्रात...

चारोळी लेखिका तथा कवयित्री लता ढोक सन्मानपत्राद्वारे सन्मानित..- गडचिरोलीत विविध सामाजिक क्षेत्रात ढोक यांची उल्लेखनीय कामगिरी 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- चारोळी लेखिका तथा कवयित्री लता उमाकांत ढोक यांची विश्र्वसत्य फाऊंडेशन क्रांतीज्योती सावित्रीमाई साहित्यिक विचार मंच छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने २९ मार्च २०२३ रोजी चक्रवर्ती महान सम्राट अशोक यांच्या जयंती निमित्त अप्रतिम चारोळी लेखन तथा काव्य लेखन केल्याबद्दल  सन्मान पत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

२९ मार्च २०२३ रोजी विश्र्वसत्य फाऊंडेशनच्या वतीने चक्रवर्ती महान सम्राट अशोक यांच्या जयंती प्रीत्यर्थ चारोळी लेखन,काव्य लेखन व इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.आयोजन प्रसंगी लता उमाकांत ढोक यांनी उत्कृष्ट चारोळी लेखन केल्याने विश्र्वसत्य फाऊंडेशनचे अध्यक्ष राजीव खंडारे, मार्गदर्शक भगवान खंडारे,समूह प्रमुख सुनीता तागवान,माला मेश्राम,सीमा वानखेडे,सह समूह प्रशासिका दुर्गा राऊत,धनश्री काळे,प्रिया भोले,कुसुम महिरे,वनिता एळींजे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.

लता ढोक यांनी सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य अविस्मरणीय व उल्लेखनीय आहेत.पूर्वी त्यांनी गडचिरोली सारख्या अतिदुर्गम,बहुल,नक्षलग्रस्त व आदिवासी जिल्ह्यात राहून जिल्ह्यातील महिला वर्गांना एकत्रित करून सामाजिक कार्यात त्यांच्या समवेत स्वतःला झोकून दिले.अनेक समाजाभिमुख कार्यात त्या स्वतः हिरीहिरीने भाग घेऊन जनसामान्य, गोर गरीब जनतेच्या प्रश्नांसाठी झटून मोर्चे काढणे, आंदोलने करणे,शासन दरबारी प्रश्न मांडून त्यावर अंमलबावणीबाबत निवेदने,स्वतः बड्या नेत्यांशी चर्चा व सल्लामसलत करून त्यावर तोडगा काढण्यावर भर देणे व इतर सामाजिक कार्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे.यापूर्वी गडचिरोली अंधश्रध्दा निर्मुलन समितीवर   त्यांनी काम केले आहे व हल्ली आता त्या नागपूर अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!