Wednesday, June 24, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक "एकल महिला दिन" साजरा..

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो; हे त्या महिलांनाच माहीत.संसाराचा गाडा हाकतांना कितीही दुःख वा संकटे ओढवलीत तरीही न डगमगता ‘अरे संसार- संसार जसा तवा चुल्ह्यावर,आधी हाताला चटके तेव्हा मिळतेय भाकर’ अशीच अवस्था एकल महिलांची झालेली असते.त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून संपूर्ण गावातील एकल महिलांचा शोध घेऊन शासनाच्या ज्या काही योजना आहेत; अश्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने मी स्वतः करून दिले आहे; त्यानुसार गावातील महिलांच्या कौटुंबिक उदरनिर्वाहासाठी मोठा हातभार लागलेला आहे.असे प्रतिपादन कोंढाळा ग्रामपंचायतीच्या प्रशासक अपर्णा नितीन राऊत यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित जागतिक “एकल महिला दिन” साजरा करतांना व्यक्त केले.यावेळी त्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या.
देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने काल,मंगळवार २३ जून रोजी जागतिक एकल महिला दिनाचे औचित्य साधून राबवण्यात येणाऱ्या सरकारी योजना,बचत गट उपक्रम व एकल महिला धोरणाविषयी अधिक माहिती उपस्थित मान्यवरांच्या वतीने देण्यात आली.विशेष म्हणजे,तालुका विधी सेवा समितीबद्दल माहिती देतांना ॲड.संजय गुरू यांनी एकल महिलांसाठी विविध कायदे,त्यांचे अधिकार व इतर कायदे विषयक बाबींवर सखोल मार्गदर्शन केले.प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून देसाईगंज पंचायत समितीचे बिडीओ रवींद्र भाबड यांनी उपस्थित एकल महिलांना आपल्या पाल्यांना चांगले शिकवा,योग्य घडण देत खूप मोठे करा,असे मोलाचे मार्गदर्शन केले.
एकल महिला ज्यात विधवा,घटस्फोटीत,परित्यक्ता आणि अविवाहित महिलांचा समावेश होतो.महाराष्ट्र शासनामार्फत ‘एकल महिला धोरण’ तयार करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे; ज्याद्वारे सुमारे ७५ लाख एकल महिलांना कायदेशीर मदत,पेन्शन,आणि रोजगाराच्या संधींचा लाभ मिळवून देण्याचे नियोजन आहे.त्यानुसार,शासन कार्य करीत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.प्रसंगी या कार्यक्रमास देसाईगंज पंचायत समितीचे गट विकास अधिकारी रवींद्र भाबड,उपविभागीय कृषी अधिकारी मुदंमवार,ॲड.संजय गुरु,ग्रामपंचायत प्रशासक अपर्णा राऊत,माजी महिला व बालकल्याण सभापती जिल्हा परिषद गडचिरोली रोशनीताई पारधी, ग्रामपंचायत अधिकारी दामोदर पटले,आरोग्य प्रबोधिनी देसाईगंजचे डॉ.सूर्यप्रकाश गभने,महिला व बालविकास सहाय्यक पवन वझाडे, ग्रा.महसूल अधिकारी ठाकरे,ग्रा.कृषि सहाय्यक तुळसकर,हरिभाऊ पत्रे अध्यक्ष तं.मु.समिती,नलिता वालदे सदस्य ग्रा.पं.,कोंढाळा एकल महिला समिती अध्यक्षा प्रतिभा चौधरी,सर्व पदाधिकारी,आरोग्य कर्मचारी,अंगणवाडी सेविका,मदतनीस यांचेसह गावातील एकल महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे स्थापन होणार नवीन अप्पर तहसील कार्यालय.. – नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून,याबाबत नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना...

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!