Sunday, August 9, 2026
Homeगडचिरोलीउमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. - 'गडचिरोली ब्रँड'साठी लोगो...

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध बाजारपेठीय ओळख मिळावी यासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासनाने ‘गडचिरोली’ या ब्रँडसाठी लोगो आणि टॅगलाईन स्पर्धा आयोजित केली आहे.या स्पर्धेतून निवडण्यात येणारा लोगो आणि टॅगलाईन भविष्यात उमेद अंतर्गत उत्पादित वस्तूंच्या ब्रँडिंगसाठी वापरण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी उमेद अभियानांतर्गत विविध स्वयं सहाय्यता समूह, उत्पादक गट आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात आली आहे.या समूहांमार्फत कृषी, प्रक्रिया उद्योग,हस्तकला,वनाधारित उत्पादने तसेच इतर विविध दर्जेदार वस्तूंचे उत्पादन केले जाते.या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने सर्व उत्पादने एकाच ब्रँड नावाखाली विक्री करण्याचा मानस जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.या पार्श्वभूमीवर आकर्षक, नाविन्यपूर्ण आणि गडचिरोली जिल्ह्याची ओळख प्रतिबिंबित करणारा ब्रँड लोगो व टॅगलाईन तयार करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.स्पर्धेत प्राप्त होणाऱ्या प्रवेशिकांमधून तज्ज्ञ समितीमार्फत सर्वोत्तम लोगो व टॅगलाईनची निवड करण्यात येणार आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात येणार असून,प्रथम क्रमांकासाठी १५ हजार रुपये,द्वितीय क्रमांकासाठी १० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये असे एकूण ३० हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी आपले लोगो आणि टॅगलाईन येत्या,३० जून २०२६ पर्यंत gadchiroli@umed.in या ई-मेलवर पाठवावेत.ई-मेलमध्ये स्पर्धकाचे संपूर्ण नाव आणि मोबाईल क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.
अधिकाधिक नागरिक,विद्यार्थी,कलाकार,डिझायनर आणि सर्जनशील व्यक्तींनी या स्पर्धेत सहभागी होऊन गडचिरोलीच्या उत्पादनांना स्वतंत्र ओळख निर्माण करण्याच्या उपक्रमात योगदान द्यावे,असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे जिल्हा अभियान संचालक,तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

महागाईची झळ; दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीसह दूध विक्रीत होणार वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतांनाच आता त्यात आणखी भर पडून दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची...

गडचिरोलीची बदनामी करण्याचा डाव; नागरिकांनी तथ्य पडताळूनच माहिती शेअर करावी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांच्या स्थितीबाबत जुनी, वस्तुस्थितीशी विसंगत तसेच अन्य राज्यांतील छायाचित्रे गडचिरोलीतील असल्याचे भासवून...

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!