- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचेकडून येत्या,२९ जून ते ३ जुलै २०२६ या कालावधीत सकाळी १०.३० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत कोरची,कुरखेडा,देसाईगंज,आरमोरी व गडचिरोली या पाच तालुक्यातील पंचायत कार्यालयाच्या सभागृहात पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे.सदर रोजगार भरती मेळाव्यामध्ये सिक्युरिटी अँड इंटेलिजेंस सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड गोंदिया(Security and Intelligence Services India Limited Gondiya)या संस्थेकडून सिक्युरिटी गार्ड व सिक्युरिटी सुपरवायजर या पदांकरीता उमेदवारांचे प्रत्यक्ष मुलाखती घेवून उमेदवारांची निवड करण्यांत येणार आहे.सदर पदांचे वेतन १७ हजार ते २३ हजार रुपयांपर्यंत राहणार असून सदर पदांकरीता गडचिरोली जिल्ह्यातील १९ ते ४० वयोगटातील सर्व ईच्छूक बेरोजगार उमेदवारांनी स्वत:चा बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्र,(१० वी पास/नापास,१२ वी, पदवी पदविधर)गुणपत्रक,आधार कार्ड,मतदान ओळखपत्र,बॅक पासबुक(मुळ व झेराक्स ),पोलीस व्हेरीफीकेशन, फोटो-६,डॉक्टर कडून मेडीकल फिटनेस प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्रासोबत स्व:खर्चाने सकाळी १०.३० ते ४.३० वाजेपर्यंत पुढील नियोजित तारखेनूसार दिलेल्या रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून या संधीचा अधिकाधिक लाभ घ्यावा,असे आवाहन सहाय्यक आयुक्त,जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली यांनी केली आहे.अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,शासकीय संकुल बॅरेक क्रमांक-२ युनिट क्रं २,कॉम्प्लेक्स,गडचिरोली या कार्यालयाशी 8291589986/8788257016 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.असे सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली यांनी कळविले आहे.
- रोजगार मेळाव्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे👇
- २९ जून २०२६ रोजी कोरची,पंचायत समिती, सभागृह कोरची येथे सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत.
- ३० जून २०२६ रोजी कुरखेडा,पंचायत समिती,सभागृह,कुरखेडा येथे सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत.
- १ जुलै २०२६ रोजी,देसाईगंज(वडसा)पंचायत समिती,सभागृह,वडसा येथे सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत.
- २ जुलै २०२६ रोजी,आरमोरी पंचायत समिती, सभागृह,आरमोरी येथे सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत.
- ३ जुलै २०२६ रोजी,गडचिरोली,पंचायत समिती, सभागृह,गडचिरोली येथे सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत.
- Advertisement -

