Thursday, May 28, 2026
Homeगडचिरोलीचारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू..

चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गृहप्रवेशाच्या पत्रिका देण्यासाठी निघालेल्या तरुणावर वाटेतच काळाने झडप घालून मृत्यूने गाठल्याची घटना आज,गुरुवार २८ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान धानोरा तालुक्याच्या रांगी येथील वळण मार्गावर घडली.नंदू चमरशींग तुलावी अंदाजे वय ३८ वर्षे,रा.खेडेगाव(मुरुमगाव),ता.धानोरा, जि.गडचिरोली असे अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.मृतक नंदू तुलावी हे कोरेगाव(रांगी)येथे वास्तव्यास असणाऱ्या आपल्या बहिणीच्या घरी गृहप्रवेशाची पत्रिका देण्यासाठी जात असतांनाच अपघातात मृत पावल्याने बहीण-भावाची भेट अपघातामुळे शेवटची ठरल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.नंदू तुलावी हे आज सकाळी साडे दहाच्या सुमारास एमएच ३३ एबी १०३९ क्रमांकाच्या दुचाकीने गृहप्रवेशाची पत्रिका देण्यासाठी धानोराकडून बहिणीच्या गावाकडे निघाले होते.दरम्यान,लिसिट हायस्कूलजवळील वळण मार्गावर येताच रांगीहून धानोराच्या दिशेने भरधाव वेगात असलेल्या एका  चारचाकी वाहनाने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.धडक इतकी भीषण होती की नंदू तुलावी हे दूरवर फेकले जाऊन त्यांच्या डोक्याला जबर मार लागला.यातच त्यांची प्राणज्योत मालवली. मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली.धानोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करून अपघातातील चारचाकी वाहन ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.घटनेने तुलावी कुटूंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दहा वर्षांपेक्षा जास्तकाळ कार्यरत असलेल्या इतर अनेक अभियंत्यांची यादी उपलब्ध असतांना केवळ मलाच लक्ष्य केले जाते.. – कोरचीतील नाडेकल पुलाशी संबंध नसल्याचा कार्यकारी अभियंता...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामात भ्रष्टाचार,अनियमितता तसेच नाडेकल पुलाच्या बांधकामासंदर्भात माध्यमातून प्रसिद्ध आरोप निराधार असल्याचा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक-२ चे कार्यकारी...

पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा शेतशिवारात आढळला मृतदेह.. – वाघाच्या अफवेने वनविभागासह पोलिस यंत्रणेची मोठी धावपळ..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-घरच्यांना दवाखान्यात जात असल्याचे सांगून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा चक्क शेतशिवारात मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.पण,मृतदेहावरील खुणा पाहून...

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!