Tuesday, August 25, 2026
Homeगडचिरोलीयुवकांना अमृत ड्रोन मिशनमधून करिअरची नवी संधी; किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक..

युवकांना अमृत ड्रोन मिशनमधून करिअरची नवी संधी; किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शेती, भूमापन,आपत्ती व्यवस्थापन,फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी तसेच विविध शासकीय प्रकल्पांच्या निरीक्षणासाठी ड्रोनचा वापर झपाट्याने वाढत असून,या क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठी गरज निर्माण झाली आहे.ही गरज लक्षात घेता महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्थेमार्फत “अमृत ड्रोन मिशन” अंतर्गत मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.इच्छुक पात्र युवकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तातडीने अर्ज करावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र संशोधन,उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी(अमृत) ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून,खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वयंरोजगार व उद्योजकतेसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध करून देण्यात येतात.त्याचाच एक भाग म्हणून ड्रोन ऑपरेटर(पायलट)प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
सदर प्रशिक्षण कार्यक्रम १० दिवसांचा निवासी कोर्स असून,यामध्ये ड्रोन उडविण्याचे तांत्रिक प्रशिक्षण, सुरक्षित उड्डाण नियमावली,ड्रोनचे देखभाल व हाताळणी,तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांवर आधारित प्रशिक्षण दिले जाते.नागरी विमान वाहतूक महासंचालनालय(DGCA)मान्यताप्राप्त नियमांनुसार हे प्रशिक्षण दिले जाते.प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना अधिकृत ड्रोन पायलट परवानाही प्रदान करण्यात येतो.
सामान्यपणे अशा प्रकारच्या प्रशिक्षणासाठी लाखो रुपयांचा खर्च येत असला,तरी अमृत संस्थेमार्फत लक्ष्यित घटकांसाठी हा कोर्स पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे.प्रशिक्षण कालावधीत राहण्याची व जेवणाची व्यवस्थाही संस्थेकडून करण्यात येते. प्रशिक्षणानंतर इच्छुक लाभार्थ्यांना ड्रोन खरेदी करून व्यवसाय सुरू करण्यासाठी अमृत संस्थेच्या कर्ज व्याजपरतावा योजनेचाही लाभ घेता येणार आहे.
या प्रशिक्षणामध्ये शेती फवारणी,पीक सर्वेक्षण, जमिनीचे सर्वेक्षण,एरियल फोटोग्राफी,व्हिडिओग्राफी, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांशी संबंधित विषयांचा समावेश करण्यात आला आहे.ग्रामीण भागातील युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
अमृत संस्थेच्या माहितीनुसार,या प्रशिक्षणाचा लाभ आतापर्यंत शंभरहून अधिक लाभार्थ्यांनी घेतला असून,अनेकांनी या कौशल्याच्या आधारे व्यवसाय सुरू करून उत्पन्नाचे साधन निर्माण केले आहे.संस्थेच्या प्रशिक्षणाच्या गुणवत्तेची दखल घेत गोवा शासनानेही आपल्या अधिकाऱ्यांना अमृत संस्थेमार्फत ड्रोन प्रशिक्षण दिले आहे.राज्यात विविध आठ केंद्रांवर हे प्रशिक्षण दिले जाते.
या योजनेचा लाभ खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पात्र युवकांना घेता येणार आहे. उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा,वय १८ ते ५५ वर्षांदरम्यान असावे,किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.शेतकरी कुटुंबातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.अर्जदाराने वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून फिटनेस प्रमाणपत्र सादर करणेही आवश्यक राहणार आहे.
अमृत संस्थेची कार्यालये राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून,अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. इच्छुक उमेदवारांनी https://app.mahaamrut.org.in/amrut-new/scheme/245 या संकेतस्थळावरून अर्ज करावा.अधिक माहितीसाठी 9112226527 या क्रमांकावर किंवा amrut.gadchirolidm@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रोजगारनिर्मितीला चालना..! तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करणे तसेच महिलांना आधुनिक काष्ठकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत...

तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ कासवांचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ भारतीय तारांकित (स्टार)कासवांना महाराष्ट्र वनविभाग आणि 'रेस्क्यूईक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर' अर्थात 'रॉ'...

बीअर बारचा परवाना देण्यासाठी पैश्याची लालच; अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बीअर बारचा परवाना देण्यासाठी आठ लाख रुपयांच्या लाचेच्या रकमेची मागणी करून तब्बल अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)नागपूर पथकाने...

अचानक समोर आलेल्या कारला दुचाकीची धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शहरात भीषण अपघाताची घटना घडून एका २० वर्षीय दुचाकी चालक तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर सहकारी तरुण गंभीर जखमी झाल्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!