- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-महाराष्ट्र विधान परिषदेच्या वर्धा-चंद्रपूर- गडचिरोली या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचे सदस्य निवृत्त झाल्यामुळे,भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे.त्यानुसार,वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या स्थानिक प्राधिकारी मतदार संघांतंर्गत १८ मे २०२६ पासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे.
- निवडणूक कार्यक्रम👇
- अधिसूचनेची प्रसिद्धी- २५ मे २०२६
- नामनिर्देशनपत्र स्विकारण्याची अंतिम तारीख- १ जून २०२६
- नामनिर्देशन पत्राची छाननी-२ जून २०२६
- उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख- ४ जून २०२६
- मतदानाचा दिनांक- १८ जून २०२६
- मतदानाची वेळ- सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत
- मतमोजणी दिनांक-२२ जून २०२६
- निवडणूक प्रक्रिया संपुष्टात येण्याची तारीख- २५ जून २०२६
भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमांनुसार वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी चंद्रपूर,तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रपूर,निवासी उपजिल्हाधिकारी वर्धा व निवासी उपजिल्हाधिकारी गडचिरोली असणार आहेत.
वरील निवडणूक प्रक्रियेअंतर्गत उपरोक्त तिन्ही जिल्ह्यातील कार्यरत असलेल्या एकूण ४० स्थानिक स्वराज्य संस्थेतील ९७७ पात्र मतदार मतपत्रिकेद्वारे आपले मतदान नोंदविणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी कळविले आहे.
- Advertisement -

