उद्रेक न्युज वृत्त :-वाढत्या महागाईने पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम केला आहे. युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम स्पष्टपणे दिसू लागला आहे.घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरवाढीपासून सुरू झालेला हा फटका दुधाच्या दरवाढी पर्यंत पोहोचला आहे.औद्योगिक डिझेल,सोने तसेच सीएनजीचे दरही वाढले आहेत.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या वाढीचा फटका थेट नागरिकांना बसत आहे. ‘महागाई’ ने पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरांच्या रूपाने नागरिकांना धक्का दिला आहे.काही शहरात पेट्रोलचा दर प्रति लिटर १०७.१३ रुपये तर डिझेलचा दर ९३.६७ रुपये इतका झाला आहे.विविध कंपन्यांनुसार या दरांत फरक असून, काही ठिकाणी पेट्रोल १०७.२६ रुपये तर डिझेल ९३.७९ रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे.इंधन दरवाढीमुळे पुन्हा एकदा महागाईचा भडका उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.याचा थेट परिणाम बाजारातील वस्तूंच्या किंमतींवर होणार आहे. मालवाहतूक महागल्याने अन्नधान्य,भाजीपाला,फळे तसेच इतर अत्यावश्यक वस्तूंचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.वाहतूक व्यावसायिकांचे म्हणणे आहे की, इंधनाच्या सतत वाढणाऱ्या किंमतीमुळे व्यवसायाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे.लवकरच दिलासा मिळाला नाही तर वाहतूक व्यवसाय तर अडचणीत येणारच,पण याचा फटका सर्वप्रथम सर्वसामान्य नागरिकांनाच सोसावा लागणार आहे.
वाढत्या महागाईने सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

