Saturday, August 29, 2026
Homeगडचिरोलीखरीप हंगामासाठी कृषी विभागाची विशेष मोहीम.. - धान,कापूस व सोयाबीन पिकांसाठी आधुनिक...

खरीप हंगामासाठी कृषी विभागाची विशेष मोहीम.. – धान,कापूस व सोयाबीन पिकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जागतिक हवामान बदल आणि संभाव्य ‘एल निनो’च्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम- २०२६ सुरळीत व यशस्वी पार पाडण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यात विशेष मोहीम हाती घेतली आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभागांतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय,गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत असून शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा वेळेत उपलब्ध करून देणे, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करणे आणि खरीप हंगामात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
संभाव्य कमी पाऊस,बदलते हवामान आणि उत्पादनातील जोखीम लक्षात घेऊन कृषी विभागाने धान,कापूस आणि सोयाबीन या प्रमुख पिकांसाठी आधुनिक व शाश्वत तंत्रज्ञानावर भर दिला आहे. मोहिमेअंतर्गत गावनिहाय कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांना लक्षांक निश्चित करून देण्यात आले असून ते पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धतींचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक,तांत्रिक मार्गदर्शन आणि विविध कृषी उपाययोजनांची माहिती देण्यात येणार आहे.
धान पिकासाठी जैविक बीजप्रक्रिया,गादी वाफ्यावर पऱ्हे घेणे,पट्टा पद्धतीचा वापर,पऱ्हे टाकल्यानंतर २० ते ३० दिवसांत रोवणी करणे,रोवणीनंतर ३० दिवसांत ट्रायकोकार्डचा वापर,हिरवळीच्या खतांचा वापर, ॲझोला तंत्रज्ञान,खोडकिड नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर तसेच डीएसआर,शून्य मशागत,ड्रम सीडिंग आणि श्री पद्धतीचा अवलंब यावर विशेष भर देण्यात येणार आहे.कापूस पिकासाठी उच्च घनतेची लागवड पद्धत (एचडीपीएस)अंतर्गत सरी-वरंबा पद्धतीने ९० बाय ३० सें.मी.अंतरावर लागवड,लागवडीवेळी खतांची मूलभूत मात्रा देणे,शेंडा खुडणी आणि ट्रायकोकार्डचा वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सोयाबीन पिकासाठी बीबीएफ सरी-वरंबा पद्धतीचा वापर,तुरीसह ४:१ आंतरपिक पद्धतीचा अवलंब तसेच ट्रायकोडर्मा आधारित बीजप्रक्रिया आणि बुरशीनाशकांचा वापर यावर भर दिला जाणार आहे.
मोहिमेअंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा व अनुभव प्रसिद्ध करून इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
  • प्रिती हिरळकर,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,गडचिरोली👇
खरीप हंगाम-२०२६ विशेष मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी कृषी विभागास सहकार्य करून विविध प्रात्यक्षिके,तंत्रज्ञान व आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करावा.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारे तब्बल १० सराईत गुन्हेगार तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलिस प्रशासन ॲक्शन मोडवर येत  नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!