Friday, May 8, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तदहावीचा निकाल जाहीर; निकालात दोन टक्क्यांची घसरण..

दहावीचा निकाल जाहीर; निकालात दोन टक्क्यांची घसरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नुकताच शनिवार,२ मे २०२६ रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला होता.बारावीत महाराष्ट्र राज्याचा ८९.७९ टक्के एकूण निकाल  लागला होता.यात मुलींनीच बाजी मारून ९३.१५ टक्के उत्तीर्णता मिळवली, तर मुलांचा निकाल ८६.८० टक्के लागला.गेल्या वर्षाच्या तुलनेत बारावीच्या निकालात सुमारे २.०९ टक्क्यांची घट झाली. अश्यातच आज,शुक्रवार ८ मे २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.यात दहावीचा राज्यातील नऊ विभागीय मंडळाचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात सुमारे दोन टक्क्यांची  घसरण झाली आहे.यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असून मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९४.९६ टक्के आहे,तर मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ९०.५६ टक्के आहे.राज्यात १४ लाख २० हजार ४८६ एकूण विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागीय निकालात कोकण विभाग प्रथम,तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
निकालात घसरण होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे,पूर्वी कॉपी करण्याचे प्रमाण वाढलेले होते.त्यामुळे,रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्यांना कमी टक्केवारी,तर कॉपी करणारे वरचढ ठरायचे.मात्र,गेल्या दोन वर्षांपासून शासनाने कॉपीमुक्त अभियान सुरू केल्याने अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेस घाम फुटू लागला आहे.हे विशेष.
  •  विभागनिहाय निकाल👇
१.नागपूर- ८९.०७ टक्के
२.पुणे- ९४.२४ टक्के
३.कोकण- ९७.६२ टक्के
४.मुंबई- ९४.९७ टक्के
५.कोल्हापूर- ९५.४७ टक्के
६.अमरावती- ९०.५० टक्के
७.छत्रपती संभाजीनगर- ८८.४१ टक्के
८.नाशिक- ९०.५३ टक्के
९.लातूर- ८८.४२ टक्के
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलिसांना न्यायालयात बिनशर्त मागावी लागली माफी.. – महिलेच्या घरात प्रवेश केल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पोलिसांना सर्वकाही माहित असतांनाही काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अंगात 'पोलीसगिरी' चा रोप झाडतांना दिसून येतात.मात्र,यांस काहीजण अपवादही आहेत.पोलीस खाते हे...

उद्याला गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांच्या वतीने उद्या,शनिवार ९ मे रोजी गडचिरोली जिल्हा...

व्यायामशाळा,क्रीडांगण व युवक कल्याण अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन.. – ग्रामपंचायत,शाळा,महाविद्यालये व शासकीय यंत्रणांसाठी प्रस्ताव आमंत्रित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणाअंतर्गत सन २०२६-२७ या सत्राकरीता व्यायामशाळा विकास अनुदान योजना,क्रीडांगण विकास अनुदान योजना व युवक कल्याण विषयक अनुदान योजनेअंतर्गत...

उद्याला दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी-मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल नुकताच शनिवार,२ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!