Tuesday, May 5, 2026
Homeनागपूरअखेर माय-लेकीच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल..

अखेर माय-लेकीच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
 नागपूर :-नागपूरच्या नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील व्यंकटेशनगर परिसरात शुक्रवार,१ मे २०२६ रोजी सकाळच्या सुमारास माय-लेकीने एकाच वेळी घरातील एका लोखंडी रॉडला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.सुरुवातीला नवजात बाळाच्या मृत्यूनंतर आलेल्या नैराश्यातून वा कौटुंबिक वादंगामुळे दोघींनीही टोकाचा निर्णय घेतला असावा,अशी शक्यता वर्तविण्यात आलेली असतांनाच प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे आली आहे.याबाबत मृतांच्या नातेवाईकांनी मोठा खुलासा करून हुंड्यासह लहान-सहान गोष्टींवरून सासरचे मंडळी मानसिक व शारीरिक छळ करीत असल्याची बाब पुढे आली आहे.त्यामुळे पोलिसांनी तक्रार आणि प्राथमिक चौकशीवरून पती,सासू, सासरा,नणंद आणि नणंदेचा पती या पाचजणाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.संगीता श्रीराम ढबाले वय ५२ वर्षे,रा.व्यंकटेशनगर, नागपूर व मुलगी आकांशा लोकेश ब्रम्हे वय २८ वर्षे, रा.ओमनगर सक्करदरा,नागपूर अशी आत्महत्या करणाऱ्या मायलेकीचे नाव आहे.संगीता शिक्षिका होत्या,तर आकांक्षाने इंजिनिरींगचे शिक्षण घेतले होते. दोन वर्षापूर्वी आकांशाचे लोकेश सुधाकर ब्रम्हे वय ३० वर्षे याच्याशी लग्न झाले होते.लोकेश हा सुद्धा इंजिनिअर असून खासगी कंपनीत नोकरीला आहे.सुरुवातीला
पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. तपासादरम्यान संगीताचे भाऊ विलास पिसे यांनी पोलिसांना सांगितले,आकांक्षाचा पती लोकेश,सासरा सुधाकर वय ६० वर्षे,सासू अनुसया वय ४८ वर्षे सर्व रा.ओमनगर,सक्करदरा व नणंद प्राची अमोल डफ आणि अमोल डफ दोन्ही रा.अंबर अपार्टमेंट,मदन रतन सिटी, नंदनवन अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे असून हे सर्वजण लग्नानंतर आकांक्षाला त्रास देत होते. माहेरहून पैसे आणण्यासाठी तिचा छळ केला जात होता. मात्र आकांक्षा चुपचाप हा त्रास सहन करीत होती.
दोन महिन्यांपूर्वी प्रसूती दरम्यान सासरच्यांनी मुलाची आवड केली.मात्र,मुलगी झाल्याने तिचा प्रसुतीनंतर काही वेळातच मृत्यू झाला.यावरून सासरची मंडळी आकांक्षाला टोमणे मारून अधिकचा त्रास देणे सुरू केले.शेवटी आकांक्षाने कंटाळून सासर सोडले व आई संगीता यांच्याकडे व्यंकटेशनगर येथे राहायला आली. आरोपी दोघींवरही संगीताच्या नावावर असलेली शेतजमीनही त्यांच्या नावावर करण्यासाठी दबाव टाकत होते.यामुळे कंटाळून संगीता आणि आकांक्षाने गळफास घेत आत्महत्या केली.प्रकरणी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कृषी विभागाच्या प्रस्ताव प्रक्रियेत कोणतीही अनियमितता नाही- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ‘२० कोटींचे मागणीपत्र बनावट’ या वृत्तातील आरोपांचे खंडन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कृषी विभागाने दिलेले २० कोटींचे मागणीपत्र बनावट असल्याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तातील आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसून,सर्व प्रस्ताव शासनाच्या नियम व प्रशासकीय निकषांनुसारच...

धक्कादायक..! नियोजित कट रचून पत्नीने केली शिक्षक पतीची हत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील घोडपेठ गावातील कर्मवीर शाळेजवळ दोन दिवसांपूर्वी आढळून आलेल्या मृतदेह प्रकरणी धक्कादायक बाबी पोलीस तपासात समोर आल्याने सर्वजण अवाक् झाले...

शंभर टक्के अनुदानावर मिळणार चार एकर कोरडवाहू किंवा २ एकर ओलिताखालील जमीन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजने अंतर्गत जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांकडून जमीन विक्रीचे...

उष्णतेची तीव्रता लक्षात घेता कामगारांच्या सुरक्षेसाठी कडक नियमावली लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यात सध्या उष्णतेची तीव्र लाट जाणवत असून वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका उघड्यावर काम करणाऱ्या कामगारांना बसत आहे.या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा आपत्ती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!