Saturday, October 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनक्षलवाद्यांच्या वरिष्ठ नेत्यांसह तब्बल ४७ नक्षलवाद्यांचे शत्रांसह आत्मसमर्पण..

नक्षलवाद्यांच्या वरिष्ठ नेत्यांसह तब्बल ४७ नक्षलवाद्यांचे शत्रांसह आत्मसमर्पण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-देशातील संपूर्ण नक्षलवाद ३१ मार्च २०२६ पर्यंत संपुष्टात आणू,असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केले होते.त्यानुसार पावले उचलण्यात आली.जे जंगल सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊ इच्छितात,त्यांना सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल,असेही स्पष्ट केले होते.अश्यातच केंद्राने निश्चित केलेली मुदत संपल्याच्या पार्श्वभूमीवर आज, शनिवार २५ एप्रिल रोजी नक्षलवाद्यांच्या वरिष्ठ नेत्यांसह तब्बल ४७ नक्षलवाद्यांनी ३२ शस्त्रे आणि ५१५ काडतुसेसह तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.विशेष म्हणजे,आत्मसमर्पण करणारे सर्वजण छत्तीसगडच्या दक्षिण बस्तर विभागातील असून, त्यांच्यामध्ये तेलंगणातील एकही व्यक्ती नाही. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये वरिष्ठ नेते,हेमला ऐतू ऊर्फ विज्ञा दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीच्या सदस्या आणि दक्षिण बस्तर डिव्हिजनल कमिटीचे प्रभारी पोडियम लाचू उर्फ मनोज,डिव्हिजनल कमिटी सदस्य आणि(गुरुला आर्मी पीएलजीए)मधील प्लाटून कमांडर या वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे.या सर्व नक्षलवाद्यांनी तेलंगणाचे पोलीस महासंचालक(डीजीपी)बी.शिवधर रेड्डी यांच्यासमोर हैदराबाद येथे आत्मसमर्पण केले. तेलंगणा सरकारच्या पुनर्वसन धोरणाने प्रभावित होऊन आणि पोलीस महासंचालकांच्या आवाहनानंतर त्यांनी मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला. आत्मसमर्पण करणाऱ्यांना १.२० कोटी रुपयांचे पुनर्वसन पॅकेज,केंद्र सरकारचे प्रोत्साहन आणि मोफत आरोग्य कार्ड दिले जाणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या पिकअप वाहनाचा अपघात; नऊ जण गंभीर जखमी,तर आठ जण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त :-पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर जिल्ह्यात निघालेल्या मजुरांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना आज,शनिवार ३ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिस...

काँग्रेसकडून विधान परिषद निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा.. -नागपूर पदवीधर मतदार संघासाठी अभिजीत वंजारी यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा  केली.यामध्ये नागपूर पदवीधर...

राहत्या घरातच सुरू होता देहव्यापाराचा अड्डा; पोलिसांची धाड.. – दोन पिडीत महिलांची सुटका,तर दोन महिलांना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राहत्या घरात देहव्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे.या प्रकरणी घटनास्थळावरून आरोपींच्या ताब्यातून...

संशयाच्या भुताने झपाटलेल्या पतीने केली पत्नीची हत्या; शवविच्छेदन अहवालात फुटले बिंग..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-संशयाचा भूत भल्या-भल्यांना नरकात धाडत असतो.तो एकदा कां अंगात शिरला,तर कधी काय होणार हे सांगणे अवघड आहे.अश्याच प्रकारे संशयाच्या भुताने झपाटलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!