Friday, July 17, 2026
Homeगडचिरोलीसावधान..! चेक अनादर झाल्यास अंतरिम भरपाई म्हणून द्यावी लागणार २० टक्के रक्कम-...

सावधान..! चेक अनादर झाल्यास अंतरिम भरपाई म्हणून द्यावी लागणार २० टक्के रक्कम- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला आदेश

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- धनादेश(चेक)अनादर झाला व त्याबाबत न्यायालयात तक्रार दाखल झाली तर तक्रारकर्त्यास आरोपीकडून धनादेशातील रकमेच्या २० टक्के रक्कम अंतरिम भरपाई म्हणून द्यावी लागेल.असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने  नुकताच एका प्रकरणामध्ये दिला आहे.सदर प्रकरण चंद्रपूर येथील असून सादर प्रकरणामध्ये तक्रारकर्त्याला आरोपीकडून १२ लाख २१ हजार ९६५ रुपये डिझेलच्या विक्री पोटी घेणे होते.

चंद्रपूर येथील व्यावसायिक पीयूष जैन हे पेट्रोल पंप मालक असून आरोपीकडून डिझेलच्या विक्री पोटी आरोपीने धनादेश दिला होता.मात्र,तो वटला नाही. तक्रारकर्त्याने न्यायदंडाधिकारी चंद्रपूर येथे कलम १३८ नुसार तक्रार दाखल केली व सादर प्रकरणात धनादेशाचे २० टक्के रक्कम मिळण्यास अर्ज केला. सदर अर्ज चंद्रपूर न्यायालयात मान्य झाला व आरोपीला २० टक्के रक्कम देण्याचा आदेश न्याय दंडाधिकाऱ्यांनी दिला. या आदेशास आरोपीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते.सदर खटल्याची सुनावणी न्यायमूर्ती गोविंद सानप यांच्यापुढे झाली. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून तसेच विविध बाजूंचा विचार करून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तक्रारकर्त्याचे म्हणणे मान्य करीत न्यायदंडाधिकारी चंद्रपूर यांचा निर्णय कायम ठेवत आरोपीला तक्रारकर्त्यास २० टक्के रक्कम अंतरिम भरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला. तक्रारकर्त्याच्या बाजूने ॲड.अभिजित वाघ यांनी बाजू मांडली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

शिवराजपूर येथे रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कामास प्रारंभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- “सामुहिक वन हक्क क्षेत्र विकास हीच आमची आस,गावातील लोकांना गाव शिवारातच लावू रोजगाराची कास" या उद्देशाने देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपूर येथील सामुहिक वन...

बापरे..! घराबाहेर उभ्या असलेल्या चिमुकलीवर मोकाट कुत्रे तुटून पडली..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-बऱ्याच ठिकाणच्या शहरात तसेच ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांची मोठी फौज पाहायला मिळते. काही मोकाट कुत्रे हल्ल्यांपासून चार हात दूरच असतात, तर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!