Monday, October 5, 2026
Homeब्रम्हपुरीआंघोळ करून शाळेचा गणवेश परिधान करणार! तेवढ्यातच कोसळला खाली.. - शालेय विद्यार्थ्यांचा...

आंघोळ करून शाळेचा गणवेश परिधान करणार! तेवढ्यातच कोसळला खाली.. – शालेय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा वसुमना पंत यांनी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू करून सकाळी ११ वाजेपर्यंतच विद्यार्थ्यांना घरी
सोडण्याबाबत संबंधित यंत्रणांना निर्देश दिले होते. चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची तीव्रता अधिक असल्याने उष्माघात (सन स्ट्रोक)व इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले असतांनाच इयत्ता चौथ्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका शालेय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल सोमवारी ब्रम्हपुरी शहरात उघडकीस आली.ईशान सत्यपाल आत्राम वय १० वर्षे, रा.देलनवाडी वार्ड,ब्रम्हपुरी,जि.चंद्रपूर असे मृतक विद्यार्थ्याचे नाव असून तो शहराच्या लोकमान्य टिळक प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होता.
जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था या सकाळच्या सत्रात सुरू करण्यात आल्या आहेत.त्यामुळे सकाळची शाळा असल्याने ईशान सकाळीच उठला व आंघोळ करून शाळेचा गणवेश लावत असतांनाच अचानकपणे खाली कोसळला.सदरचे दृश्य पाहून पालकांनी त्याला तात्काळ उपचारार्थ शहरातील खिस्तानंद हॉस्पिटलमध्ये भरती केले.जवळपास अर्धा तास उपचार सुरू असतांनाच ईशानचा दुर्दैवी मृत्यू झाला.अचानकपणे उद्भवलेल्या प्रसंगाने कुटुंबीयांचे काळीज हेलावले.दरम्यान,पालकांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास नकार दिल्याने मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शरीरातील पाण्याची कमतरता,ऑक्सिजनची कमतरता वा हृदयविकाराचा तीव्र धक्का मृत्यूचे कारण असू शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

“उमेद मॉल”च्या माध्यमातून महिला उद्योजकांना मिळणार मोठे व्यासपीठ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला स्वयं सहाय्यता समूहांच्या वस्तु व उत्पादन विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राज्य...

अखेर भाजपचा सस्पेन्स संपला; विधान परिषदेच्या तीन उमेदवारांची घोषणा.. – नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी सुधाकर कोहळे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसने डॉ.अभिजीत वंजारी यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.अश्यातच आता...

हातातोंडाशी आलेले पीक जंगली हत्तींमुळे उद्ध्वस्त; शेतकरी चिंताग्रस्त..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जंगली हत्तींचा कळप ऐन निसाव्यावर आलेल्या धानपिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करीत असल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत. अश्यातच गेल्या तीन दिवसांपासून जंगली...

भरधाव ट्रेलरची दुचाकीला जोरदार धडक; पती-पत्नी व चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरहून बुटीबोरीकडे दुचाकीने निघालेल्या कुटुंबियांवर काळाने घाला घालून दुचाकीवरील पती, पत्नी व अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्याचा करून अंत झाला.तर त्यांचा ६...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!