- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या चौकांवर ट्रॅफिक सिग्नल लागल्यामुळे प्रवाशांना बराच वेळ कडक उन्हात थांबून राहावे लागते. प्रखर उन्हाच्या झळा आणि डोक्यावर तळपता सूर्य येत असल्याने यामुळे वाहनचालकांचे प्रचंड हाल होत असल्याची अडचण लक्षात घेता गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेकडून दुपारच्या वेळेत ट्रॅफिक सिग्नल बंद ठेवण्याची अंमलबजावणी करण्यात आली असून दुपारी साडे बारा ते चार वाजेपर्यंत ट्रॅफिक सिग्नल बंद राहणार आहेत.यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.विशेष म्हणजे,गडचिरोली जिल्ह्याचे तापमान ४१ अंशाच्या पुढे गेल्याने प्रखर उन्हाचा तडाखा नागरिकांना सोसावा लागत आहे.यासाठी घेतलेल्या निर्णयाने वाहतूक धारकांनी समाधान व्यक्त केले आहे.
- Advertisement -

