Sunday, August 16, 2026
Homeनांदेडचार शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू..!

चार शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नांदेड :-शाळेची सुट्टी झाल्यानंतर घराकडे परतणाऱ्या चार अल्पवयीन शाळकरी मुलांनी रत्याच्या कडेला असलेल्या मार्गावरील खड्ड्यातील पाण्यात उतरून आंघोळ करत असतांनाच खोल पाण्याचा अंदाज न आल्याने चारही शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार १६ एप्रिल रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास नांदेड शहराच्या हारूनबाग परिसरात घडली.घटनेने नांदेड शहरात शोककळा पसरली असून मृतक चिमुकल्यांच्या कुटुंबीयांनी काळजाचा थरकाप उडवणारा आक्रोश केला.मोहम्मद अली वय १३ वर्षे, सय्यद फूरखान वय १३ वर्षे,मोहम्मद अदनान वय १० वर्षे आणि मोहम्मद रेहान वय ११ वर्षे,अशी मृत मुलांची नावे असून चौघेही नांदेड शहराच्या इस्लामपूरा भागातील आहेत.यातील फूरखान आणि रेहान हे दोघे सख्खे भाऊ होते.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. जवळच काठावर मुलांचे शालेय गणवेश,जुते आणि चपला आढळून आल्या,तेव्हा या दुर्घटनेची भीषणता समोर आली.घटनेचे वृत्त कळताच पोलीस उपअधीक्षक प्रशांत शिंदे,इतवारा पोलीस ठाण्याचे  अधिकारी व जीवरक्षक दल घटनास्थळी दाखल झाले.चौघांचे मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.हारुनबाग परिसरात नाल्याचे काम सुरू आहे.तिथे मोठ-मोठे खड्डे पडून पाणी साचले असल्याने उन्हाचा तडाखा किंवा खेळण्याच्या ओघात शाळकरी मुले आंघोळ वा पोहण्याच्या उद्देशाने त्या पाण्यात उतरली असावी.मात्र,खड्ड्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पाणी अतिशय खोल असल्याने चारही मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडच्या बड्या कलाकारांना दणका..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बॉलिवूड सिनेसृष्टीतील तीन बड्या कलाकारांना मोठा दणका दिला आहे.नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या पान...

पोलीस विभागात खळबळ; सहाय्यक पोलिस निरीक्षकाने संपवली जीवनयात्रा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाने(एपीआय) पीसीएमटीच्या शासकीय निवासस्थानी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची...

गडचिरोलीतील रस्त्यांसाठी सुमारे २ हजार ६०० कोटींचा भरीव निधी; पायाभूत सुविधांच्या विकासाला गती.. – पोलीस जवानांचे योगदान अविस्मरणीय- ॲड.आशिष जयस्वाल

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासोबत जिल्ह्याचा समृद्ध नैसर्गिक व सांस्कृतिक वारसा जपत स्थानिकांना जिल्ह्यातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर...

उद्याला राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे गृह(ग्रामीण),गृहनिर्माण, शालेय शिक्षण,सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर हे उद्या,रविवार १६ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!