Tuesday, September 1, 2026
Homeनागपूरवर्दळीच्या भागात स्फोटके आढळल्याने खळबळ..

वर्दळीच्या भागात स्फोटके आढळल्याने खळबळ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-शहराच्या गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वर्दळीच्या दोसर भवन चौक परिसरात उज्वल लांजेवार यांच्या इमारतीच्या खुल्या जागेमध्ये आज, मंगळवार ७ एप्रिल रोजी संशयास्पद स्फोटके  आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.एका बॅगेत ५० डिटोनेटर,८ कनेक्टर व १५ जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्या.आज सकाळच्या सुमारास लांजेवार कुटुंबियातील सदस्य अंगणात गेले असता त्यांना एक संशयास्पद बेवारस बॅग दिसली.बॅग उघडून पाहिल्यावर त्यात स्फोटकासारखी सामग्री असल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले.सूचना मिळताच गणेशपेठ पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून परिसराचा ताबा घेतला आणि सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण भाग सील केला.बॉम्ब शोधक व नाशक पथकाने  केलेल्या प्राथमिक तपासात १५ जिलेटिन कांड्या,५० डेटोनेटर आणि ८ कनेक्टर आढळून आले आहेत.
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल स्वतः घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी कुटुंबीयांशी चर्चा करून तपास वेगाने करण्याच्या सूचना दिल्या.ही स्फोटके येथे कशी आली आणि त्यामागे कोणाचा हात आहे, याचा शोध घेणे प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान,पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेतले असून,रात्री किंवा पहाटेच्या सुमारास कोणीतरी ही बॅग टाकून गेला का,याचा तपास सुरू आहे.या प्रकरणात दहशतवादी कटाचा कोणताही संबंध आहे का,याचीही चौकशी केली जात आहे.
जिलेटिनचा वापर सामान्यतः खाणकाम किंवा विहिरी खोदण्यासाठी केला जातो.मात्र,शहराच्या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या भागात अशा प्रकारे स्फोटके सापडल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे एटीएसकडूनही समांतर तपास होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तपास अधिक व्यापक करण्यासाठी ‘पेसो’ आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी च्या तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.सापडलेली स्फोटके किती जुनी आहेत आणि त्यांची क्षमता किती आहे,याचा अभ्यास केला जात आहे.
गणेशपेठ परिसर हा बस आणि रेल्वे स्थानकाच्या जवळ असल्याने येथे नेहमीच वर्दळ असते.या घटनेची माहिती समजताच मोठ्या संख्येने नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी आसपासची दुकाने तात्पुरती बंद करण्याचे आदेश दिले असून,नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.एकाचवेळी डिटोनेटर व जिलेटीनच्या कांड्या कुणी आणून ठेवल्या याचा मागोवा घेण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!