Monday, August 31, 2026
Homeनागपूरभोंदू बाबा प्रकरणात दोषी असणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भोंदू बाबा प्रकरणात दोषी असणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण उघडकीस येताच राज्यात एकच खळबळ उडाली आहे.अश्यातच विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देतांना फडणवीस म्हणाले की,या प्रकरणाला विनाकारण राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. खरातला भेटायला विरोधी पक्षाचे कोण-कोण गेले,याचे सर्वाधिक पुरावे माझ्याकडे आहेत.मात्र,ते पोलिसांचे काम आहे.माझे नाही.केवळ कोणासोबत फोटो आहेत म्हणून कारवाई करणे चुकीचे आहे.पण,जर कोणाचा प्रत्यक्ष सक्रिय सहभाग आढळला,तर त्यांच्यावर कायद्याचा बडगा नक्कीच उगारला जाईल.प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलतांना आपली भूमिका स्पष्ट करत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.अशोक खरात प्रकरण अत्यंत गंभीर असून, ‘इंटेलिजन्स’च्या आधारे आम्हीच या प्रकरणाचा भंडाफोड केला आहे.पीडित महिलांना धीर देऊन त्यांना समोर आणण्याचे काम सुरू आहे.या प्रकरणात दोषी असणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही,” असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.या प्रकरणाच्या गांभीर्याची दखल घेत वरिष्ठ स्तरावर देखरेख सुरू आहे.राज्याच्या पोलिस महासंचालकांना स्वतः लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या आहेत.यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी)स्थापना केली आहे. नाशिक पोलिस आयुक्त आणि ‘एसआयटी’ मिळून वेगाने तपास करत आहेत. आपल्या ‘तथाकथित शक्ती’ चा वापर करून महिलांना जाळ्यात ओढणे,यापेक्षा दुसरा मोठा गुन्हा असू शकत नाही.ही महिलांच्या सन्मानाची आणि अस्मितेची लढाई आहे.ज्या-ज्या महिलांसोबत गैरप्रकार झाला आहे,त्या प्रत्येकीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. कोणाकडेही या संदर्भात पुरावे असल्यास त्यांनी ते समोर आणावेत,दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!