- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील स्फोटके बनवणाऱ्या एसबीएल कंपनीतील भीषण स्फोट प्रकरणात सहा आरोपींनी अटकेपासून बचावासाठी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. एसबीएल कंपनीत १ मार्च २०२६ रोजी भीषण स्फोट झाला होता.या घटनेची माहिती मिळताच कंपनीचे संचालक रायपूर(छत्तीसगड)येथील आलोक चौधरी आणि संजय चौधरी यांच्यासह एकूण ११ आरोपी त्यांच्या घरून व इतर ठिकाणांहून फरार झाले होते. प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असून फरार आरोपींचा शोध महाराष्ट्रासह तीन राज्यांत सुरू आहे.घटनेला ९ दिवस उलटूनही फरार आरोपींबाबत पोलिसांना अद्याप ठोस धागेदोरे मिळाले नाहीत.दरम्यान,कंपनीत झालेल्या स्फोटात मृतांची संख्या सातत्याने वाढत असून ती आता २५ वर पोहोचली आहे.दरम्यान,फरार ११ आरोपींपैकी आलोक अवधिया,अरविंद पाचपुत्रे, श्रवण कुमार,रवींद्र पोखर्णा,मनोजकुमार प्रसाद आणि सत्यवती पाराशर यांनी अटकेपासून बचावासाठी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.सोमवारी बचाव पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला.आरोपींच्यावतीने ॲड.प्रकाश जायसवाल,ॲड.प्रफुल्ल मोहगावकर यांच्यासह अन्य वकिलांनी बाजू मांडली.पोलिसांनी या प्रकरणात लेखी उत्तर सादर करून आरोपींच्या जामीन अर्जाला कडाडून विरोध केला.जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे आणि ॲड.मैथिली काळवीट यांनी न्यायालयाला सांगितले की,पाराशर या कंपनीच्या संचालकांपैकी एक असून त्यांनी आपल्या जबाबदाऱ्यांचे योग्य पालन केले नाही.त्यामुळेच हा स्फोट होऊन कामगारांचा मृत्यू झाला.तसेच इतर आरोपींच्या निष्काळजीपणाही या दुर्घटनेला कारणीभूत ठरल्याचे त्यांनी नमूद केले.दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.आर.पुरवार यांनी सर्व आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावले आहे.
- Advertisement -

