Thursday, September 10, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर शेतकऱ्यांची मागील वर्षातील नुकसानभरपाईची प्रतीक्षा संपली.. - याद्या सेतू केंद्रात; ई-केवायसी...

अखेर शेतकऱ्यांची मागील वर्षातील नुकसानभरपाईची प्रतीक्षा संपली.. – याद्या सेतू केंद्रात; ई-केवायसी करणे आवश्यक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मागील वर्षीच्या ऑक्टोंबर महिन्यात अतिवृष्टीने झालेल्या धान पिकांच्या नुकसानभरपाईची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.यासंदर्भात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या ऑनलाईन सेतू केंद्रात पाठविण्यात आल्या असून ज्या शेतकऱ्यांचे नाव यादीमध्ये असेल,अश्यांनी सेतू केंद्रात जाऊन ई-केवायसी करून घ्यावी,असे कळविण्यात आले आहे.विशेष म्हणजे,जो पर्यंत ई-केवायसी केली जाणार नाही,तो पर्यंत नुकसानभरपाईची रक्कम खात्यात जमा होणार नाही.
मागील वर्षात हलके व मध्यम मुदतीचे धान ऐन कापणीला आल्यानंतर तसेच काही धानाची कापणी झाल्यानंतर नेमके याचवेळी वादळी वाऱ्यासह परतीच्या अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. अवकाळी पाऊस व वादळ वाऱ्यामुळे धान पीकाचे मोठे नुकसान झाले होते.सलग तीन ते चार दिवस पाऊस कोसळत राहिल्याने बांधात साचलेले पाणी पाट तयार करून काढण्याचे प्रयत्न शेतकऱ्यांनी केले.मात्र,अनेक शेतकऱ्यांचे प्रयत्न असफल ठरले. विविध तालुक्यातील हजारो हेक्टरवरील धान पिकाचे यात नुकसान झाले होते.या पार्श्वभूमीवर महसूल विभागाच्या निर्देशानुसार पंचनामे करण्यात आले होते.मात्र,गेली पाच महिने लोटूनही नुकसानभरपाई मिळण्याचे नावच घेत नव्हती. अश्यातच आता मागील वर्षातील नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे काम तहसील कार्यालयाकडून सुरू करण्यात आल्याने येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम जमा होणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यस्तरीय ज्युनियर ‘कुंग फू’ स्पर्धेत वांगेपल्ली शाळेच्या मोहनला कांस्यपदक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पुणे येथे पार पडलेल्या २४ व्या राज्यस्तरीय 'ज्युनियर वुशू स्पर्धा-२०२६' मध्ये अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथील शासकीय निवासी शाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी...

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!