Wednesday, October 28, 2026
Homeगडचिरोलीमुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती जावळकर यांचे राज्यातील विद्यार्थ्यांना संविधान विषयक प्रेरणादायी मार्गदर्शन..

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती जावळकर यांचे राज्यातील विद्यार्थ्यांना संविधान विषयक प्रेरणादायी मार्गदर्शन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य ॲड.धर्मपाल मेश्राम यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात येत असलेल्या संविधान जागृती प्रश्नमंजूषा २०२५-२६ या उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. संविधानाबद्दल सखोल ज्ञान,लोकशाही मूल्यांची जाणीव आणि सामाजिक न्यायाची बांधिलकी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याच्या उद्देशाने हा राज्यव्यापी उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत ऑनलाईन संविधान प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली मराठी,हिंदी व इंग्रजी भाषेत प्रशिक्षण दिले जात आहे.हे प्रशिक्षण महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी,नागपूर येथील डॉ.कैलास वसावे,डॉ.दिविता कोठेकर,डॉ.आरती तायडे,डॉ.व्ही.पी.तिवारी तसेच महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी,मुंबई येथील डॉ.जगदीश खोब्रागडे,डॉ.साहिली सुरजुसे व डॉ.अमोल चौव्हाण यांच्या मार्फत प्रभावीपणे दिले जात आहे.
या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत आयोजित विशेष सत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून न्यायमूर्ती श्रीमती एम.एस. जावळकर,अतिरिक्त न्यायाधीश,मुंबई उच्च न्यायालय (नागपूर खंडपीठ)यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे अमूल्य मार्गदर्शन केले.त्यांनी भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार,कर्तव्ये,समानता,स्वातंत्र्य,बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी उत्तरे दिली.
सदर विशेष सत्रात न्या.आर.सी.चौव्हाण,न्या. पृथ्वीराज चौव्हाण,माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित तसेच माजी आयुक्त(समाज कल्याण),झेड.खोब्रागडे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनाल अ.थुल यांनी केले.कार्यक्रमास डॉ.जगदीश खोब्रागडे,डॉ. साहिली सुरजुसे व डॉ.आरती तायडे यांची उपस्थिती लाभली.राज्यातील विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत या उपक्रमास अधिक प्रभावी बनविले.
संविधान जागृती प्रश्नमंजूषा २०२५-२६ हा उपक्रम केवळ स्पर्धा नसून संविधान मूल्यांची जपणूक, जागरूक नागरिकत्वाची जाणीव आणि लोकशाही बळकटीसाठीची एक प्रेरणादायी चळवळ ठरत आहे. राज्यातील युवक-युवतींमध्ये संविधानाबद्दल अभिमान व जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी हा उपक्रम निश्चितच मैलाचा दगड ठरत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अज्ञात मारेकऱ्यांनी विटांनी ठेचून माजी प्राध्यापकाची केली हत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोथली गावनजीक एका माजी प्राध्यापकाची अज्ञात मारेकऱ्यांनी विटांनी ठेचून हत्या केल्याची घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ...

चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीत..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही येत्या,२१ फेब्रुवारी २०२७ रोजी...

शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणे वाटपासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चारा उत्पादन वाढविण्यासाठी सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकरी व पशुपालकांना शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणे उपलब्ध करून...

गडचिरोली जिल्ह्यात ५४ धान खरेदी केंद्रांना मंजुरी; आधारभूत धान खरेदीसाठी २० केंद्रांवर शेतकरी नोंदणी सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत पणन हंगाम २०२६-२७ साठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ५४ धान खरेदी केंद्रांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!