Monday, August 31, 2026
Homeनागपूरशेतातील वालाच्या शेंगा तोडत असतांना वाघाचा हल्ला; पत्नीचा मृत्यू तर पतीला किरकोळ...

शेतातील वालाच्या शेंगा तोडत असतांना वाघाचा हल्ला; पत्नीचा मृत्यू तर पतीला किरकोळ दुखापत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा मृत्यू झाला, तर पतीला किरकोळ दुखापत झाल्याची घटना काल शुक्रवारी दुपारच्या सुमारास सावरा गाव नजीकच्या शेत शिवारात घडली.घटनेच्या वेळी पती-पत्नी त्यांच्या शेतातील वालाच्या शेंगा तोडत असतांनाच दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला चढवला यात मुक्ता जुगड्या मरसकोल्हे वय ३५ वर्षे असे मृत पत्नीचे नाव आहे;तर जुगड्या मरसकोल्हे वय ४० वर्षे,रा.सावरा,ता. रामटेक, जि.नागपूर असे जखमी पतीचे नाव आहे.
मरसकोल्हे यांची सावरा गावाच्या शिवारात जंगलालगत शेती आहे.वालाच्या शेंगा विकायला न्यायच्या असल्याने दोघेही त्यांच्या शेतातील वेलींना लागलेल्या पक्व शेंगा तोडत होते.काही कळण्याच्या आत जंगलातून आलेल्या वाघाने मुक्तावर झडप मारली.वाघ तिला फरफटत नेत असतांना पती जुगड्याने तिला सोडविण्याचा प्रयत्न केला.परंतु, फारसे यश न आल्याने त्याने आरडाओरड केली.ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारच्या शेतातील शेतकरी व मजूर मदतीला धावून आल्याने वाघाने तिला सोडले व जंगलाच्या दिशेने पळून गेला.गळा,मान,चेहरा व शरीराच्या अन्य भागावर गंभीर जखमा झाल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.माहिती मिळताच पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या उपवनसंरक्षक पूजा लिंबगावकर,क्षेत्र संचालक अक्षय गजभिये,उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते,ठाणेदार नारायण तुरकुंडे,अरविंदकुमार कतलाम व राजेश थोरात,पवनी बफर झोनचे लक्ष्मीकांत ठाकरे, प्रादेशिकचे सागर बन्सोड,जयेश तायडे यांनी घटनास्थळ गाठून पाहणी करून पंचनामा केला व जखमी जुगड्या मरसकोल्हे यांना रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!