Thursday, September 10, 2026
Homeगडचिरोलीएकलव्य निवासी शाळा प्रवेशपूर्व परीक्षा; तीन तालुक्यातील परीक्षा कोरचीत..

एकलव्य निवासी शाळा प्रवेशपूर्व परीक्षा; तीन तालुक्यातील परीक्षा कोरचीत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात एकलव्य निवासी शाळामध्ये इयत्ता ६ वी चे वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या व इयत्ता ७ वी ते ९ वीच्या वर्गातील विद्यार्थी अनुशेष भरुन काढण्याची शासकीय व अनुदानित आश्रमशाळा जिल्हा परीषद,नगरपालिका, महानगरपालिका व इतर शासनमान्यता प्राप्त प्राथमिक व माध्यमिक शाळेतील अनुसूचित/आदिम जमातीच्या विद्यार्थ्याकरीता स्पर्धा परीक्षेचे आयोजन येत्या,रविवार १ मार्च २०२६ रोजी इयत्ता ६ वी करीता सकाळी ११ ते दुपारी १ या वेळात तसेच इयत्ता ७ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांकरीता सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत  करण्यात आले आहे.
इयत्ता ६ वी ते ९ वीच्या वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.सदरची यादी परीक्षा केंद्रनिहाय लावण्यात आलेली आहे.प्रवेशपूर्व परीक्षा गडचिरोली,धानोरा,चामोर्शी,आरमोरी या तालुक्यातील शाळांसाठी एकलव्य निवासी शाळा चामोर्शी(सद्यास्थित-शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा,गडचिरोली)येथे तसेच वडसा,कुरखेडा, कोरची या तालुक्यातील शाळांसाठी एकलव्य निवासी शाळा कोरची(सद्यास्थित-शासकीय माध्यमिक आश्रमशाळा,कोरची)या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी ९ वाजता हजर राहावे.विद्यार्थ्यांनी आधार कार्ड किंवा ओळखपत्र सोबत आणावे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सुरक्षितपणे आणण्याची जबाबदारी संबंधित आश्रमशाळा, जि.प.अनुदानित व इतर शाळांच्या मुख्याधापक/शिक्षकांची आहे.परीक्षा केंद्रावर सर्व विद्यार्थ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे,असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अरुण एम.यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यस्तरीय ज्युनियर ‘कुंग फू’ स्पर्धेत वांगेपल्ली शाळेच्या मोहनला कांस्यपदक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पुणे येथे पार पडलेल्या २४ व्या राज्यस्तरीय 'ज्युनियर वुशू स्पर्धा-२०२६' मध्ये अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथील शासकीय निवासी शाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी...

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!