- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्याच्या अतिदुर्गम,आदिवासी भागातील नक्षलवाद संपुष्टात येऊ लागला आहे.गेल्या अनेक कालावधीपासून नक्षलवाद्यांच्या दहशतीखाली जीवन जगणाऱ्या नागरिकांनी सुखमय जीवनाची स्वप्ने रंगविण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे.अश्यातच आज,बुधवार १८ फेब्रुवारीला गडचिरोली पोलिस दल आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या(सीआरपीएफ) जवानांनी उरल्या-सुरल्या भितीचाही नायनाट करून वेगवेगळ्या ठिकाणातील तब्बल ४४ नक्षलवाद्यांची स्मारके उद्ध्वस्त केलीत.यात एटापल्ली उपविभागातील १८,हेडरी उपविभागातील १७,भामरागड उपविभागातील ५,जिमलगट्टा उपविभागातील २,धानोरा उपविभागातील १ व पेंढरी उपविभागातील १ अशा एकूण ४४ नक्षलवादी स्मारकांचा समावेश आहे.
गडचिरोली पोलीस दलाने नक्षलवाद्यांचे आश्रयस्थान समजल्या जाणाऱ्या अतिदुर्गम पेनगुंडा,कवंडे, तुमरकोठी,गर्देवाडा,वांगेतुरी व गट्टा(जांब)आदी गावांतील नक्षलवाद्यांची स्मारके उद्ध्वस्त करून लोकांच्या मनातील उरल्या-सुरल्या दहशतीचे सावट संपुष्टात आणले आहे.या मोहिमेत सी-६०,केंद्रीय राखीव दल आणि जिल्हा पोलिस दलाचे सुमारे ८०० जवान सहभागी झाले होते.एकूण १८ पथकांनी जिल्ह्याच्या अतिदुर्गम जंगल परिसरात एकाच वेळी ही कारवाई केली.यामध्ये १६ बॉम्ब शोधक व नाशक पथके आणि विशेष अभियान पथकांचा समावेश होता.
- Advertisement -

