Friday, July 17, 2026
Homeगडचिरोलीआता नक्षलवाद्यांची उरली-सुरली भितीही संपली; नक्षलवाद्यांची स्मारके उद्ध्वस्त

आता नक्षलवाद्यांची उरली-सुरली भितीही संपली; नक्षलवाद्यांची स्मारके उद्ध्वस्त

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या अतिदुर्गम,आदिवासी भागातील नक्षलवाद संपुष्टात येऊ लागला आहे.गेल्या अनेक कालावधीपासून नक्षलवाद्यांच्या दहशतीखाली जीवन जगणाऱ्या नागरिकांनी सुखमय जीवनाची स्वप्ने रंगविण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे.अश्यातच आज,बुधवार १८ फेब्रुवारीला गडचिरोली पोलिस दल आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या(सीआरपीएफ) जवानांनी उरल्या-सुरल्या भितीचाही नायनाट करून वेगवेगळ्या ठिकाणातील तब्बल ४४ नक्षलवाद्यांची स्मारके उद्ध्वस्त केलीत.यात एटापल्ली उपविभागातील १८,हेडरी उपविभागातील १७,भामरागड उपविभागातील ५,जिमलगट्टा उपविभागातील २,धानोरा उपविभागातील १ व पेंढरी उपविभागातील १ अशा एकूण ४४ नक्षलवादी स्मारकांचा समावेश आहे.
गडचिरोली पोलीस दलाने नक्षलवाद्यांचे आश्रयस्थान समजल्या जाणाऱ्या अतिदुर्गम पेनगुंडा,कवंडे, तुमरकोठी,गर्देवाडा,वांगेतुरी व गट्टा(जांब)आदी गावांतील नक्षलवाद्यांची स्मारके उद्ध्वस्त करून लोकांच्या मनातील उरल्या-सुरल्या दहशतीचे सावट संपुष्टात आणले आहे.या मोहिमेत सी-६०,केंद्रीय राखीव दल आणि जिल्हा पोलिस दलाचे सुमारे ८०० जवान सहभागी झाले होते.एकूण १८ पथकांनी जिल्ह्याच्या अतिदुर्गम जंगल परिसरात एकाच वेळी ही कारवाई केली.यामध्ये १६  बॉम्ब शोधक व नाशक पथके आणि विशेष अभियान पथकांचा समावेश होता.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता राज्यातील रुग्णालयांत इच्छामरणासाठी विशेष वैद्यकीय समित्या होणार स्थापन; शासन निर्णय जारी..

उद्रेक न्युज वृत्त :-जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत गंभीर व्याधीने ग्रस्त आणि दीर्घकाळ बेशुद्धावस्थेत राहते, तेव्हा अशी व्यक्ती स्वतः निर्णय घेऊ शकत नाही.अशा वेळी मरण...

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

शिवराजपूर येथे रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कामास प्रारंभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- “सामुहिक वन हक्क क्षेत्र विकास हीच आमची आस,गावातील लोकांना गाव शिवारातच लावू रोजगाराची कास" या उद्देशाने देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपूर येथील सामुहिक वन...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!