Tuesday, September 1, 2026
Homeगडचिरोलीआता विविध सण-उत्सवांसाठी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत पोंगा वाजविण्याची परवानगी.....

आता विविध सण-उत्सवांसाठी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत पोंगा वाजविण्याची परवानगी.. – शिवजयंती,आंबेडकर जयंतीसह सात सण-उत्सवांसाठी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदूषण(नियमन व नियंत्रण)सुधारित नियम,२०१७ च्या नियम ५ उपनियम (३)अन्वये राज्य शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना वर्षातून १५ दिवस ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सशर्त सुट जाहीर करण्याचे अधिकार प्रदान केले आहेत.त्यानुसार, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्याशी सल्लामसलत करून सन २०२६ या वर्षाकरिता ठरावीक १५ दिवस सकाळी ६.०० ते रात्री १२.०० वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरण्यास परवानगी जाहीर केली आहे.
  • रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीवर्धक वापरण्यास निश्चित करण्यात आलेले दिवस पुढीलप्रमाणे👇
शिवजयंती(१९ फेब्रुवारी २०२६),डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती(१४ एप्रिल २०२६),ईद-ए-मिलाद (२६ ऑगस्ट २०२६),गणेश उत्सवासाठी चार दिवस (२०,२३,२४ व २५ सप्टेंबर २०२६),नवरात्र उत्सवासाठी चार दिवस (१९,२०,२१ व २२ ऑक्टोंबर २०२६),दिवाळी लक्ष्मीपूजन (८ नोव्हेंबर २०२६), ख्रिसमस(२५ डिसेंबर २०२६)तसेच ३१ डिसेंबर २०२६ अशा एकूण १५ दिवसांचा समावेश आहे.
ही सुट श्रोत्यगृहे,सभागृहे,सामूहिक सभागृहे व मेजवानी कक्ष यांसारख्या बंद जागांव्यतिरिक्त इतर ठिकाणी लागू राहील.मात्र,केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या ध्वनी प्रदूषण(नियमन व नियंत्रण)नियम २००० तसेच सुधारित नियम २०१७ मधील तरतुदींचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहील.जनहित याचिका क्र.१७३/२०१० मध्ये उच्च न्यायालयाने १६ ऑगस्ट २०१६ रोजी दिलेल्या आदेशांचे पालन करणे आवश्यक राहील.
जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार निश्चित ध्वनी मर्यादा व अटींचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता संबंधित आयोजक व विभागांनी घ्यावी.राज्य शासनाने घोषित केलेल्या शांतता क्षेत्रात ही सवलत लागू राहणार नाही, असेही जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!