- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-कुणबी जातीचा दाखला व कास्ट व्हॅलीडीटी काढण्याकरिता एका तलाठीने तहसील कार्यालयात व प्रांत कार्यालयात ओळख असल्याचे सांगून १३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.यातील पहिला टप्पा म्हणून कुणबी जातीचा दाखला काढण्याकरिता ६ हजार रुपयांची लाच घेण्याची तयारी दर्शवली.महत्वाचे म्हणजे,सापळा कारवाईत तलाठ्याच्या सांगण्यावरून खाजगी इसमाने मागणी केलेली ६ हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारून सदर लाच रक्कम तलाठ्याचा भाच्याकडे दिली.प्रकरणी तलाठ्याची करणी भाचा व खासगी इसमाच्या माथी पडल्याची घटना संगमनेर तालुक्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यात घडली.१. बाबासाहेब गंगाधर बोऱ्हाडे,वय ५७ वर्षे,आश्वी बुद्रुक गावचे तलाठी,ता.संगमनेर जि.अहिल्यानगर. २.हितेश सोमनाथ घोडेकर वय २८ वर्षे धंदा-मेडिकल स्टोअर, रा.राजापुर रोड ढोलेवाडा,ता.संगमनेर,जि.अहिल्यानगर (खाजगी इसम) व ३.प्रतीक विजयकुमार कातोरे वय २६ वर्षे,धंदा-मेडिकल स्टोअर रा.सांगवी ता.संगमनेर जि.अहिल्यानगर (खाजगी इसम बोऱ्हाडे यांचा भाचा) अशी अटक केलेल्या तिन्ही आरोपींची नावे असून सदरची कारवाई ही नाशिक व अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल मंगळवारी केली.प्रकरणी तिघांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ अ व १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,प्रकरणातील तक्रारदार हे शिक्षण घेत असून त्यांचा कुणबी जातीचा दाखला काढण्याकरिता व कास्ट व्हॅलीडीटी काढण्याकरिता आश्वी बुद्रुक येथील तलाठी बाबासाहेब बोऱ्हाडे यांनी त्यांची तहसील कार्यालयात व प्रांत कार्यालयात ओळख असल्याचे सांगून तक्रारदार यांच्याकडे यापूर्वी १३ हजार रुपये लाच मागणी करून लाच स्वीकारली होती.तसेच आता बोऱ्हाडे हे तक्रारदार यांच्या मोठ्या बहिणीचा कुणबी जातीचा दाखला काढण्यासाठी ६ हजार रुपये व कास्ट व्हॅलिडीटी काढून देण्याकरीता ७ हजार रुपये असे मिळून एकूण १३ हजार रुपये लाच मागणी करत असल्याबाबतची तक्रार अहिल्यानगर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदार यांनी केली होती. त्यानुसार,काल मंगळवार १७ फेब्रुवारी रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता एकूण १३ हजाराची लाच मागणी करून त्यापैकी पहिला टप्पा म्हणून कुणबी जातीचा दाखला काढण्याकरिता ६ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली असल्याचे निष्पन्न झाल्याने सापळा रचण्यात आला.सापळ्यात तलाठी बोऱ्हाडे याचे सांगण्यावरून खाजगी इसम हितेश घोडेकर यांनी तक्रारदार यांच्याकडून मागणी केलेली लाचेची रक्कम ६ हजार रुपये स्वीकारून सदर लाच रक्कम दुसरे खाजगी इसम प्रतीक कातोरे याच्याकडे देताच तीनही आरोपींना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले.
सदरची सापळा कारवाई सापळा अधिकारी पोलीस उप अधीक्षक अजित त्रिपुटे मो.नं.८३२९७०१३४४
(पर्यवेक्षण अधिकारी ला.प्र.वि.अहिल्यानगर),पोहेकाँ.
संतोष शिंदे,पोकाँ रविंद्र निमसे,बाबासाहेब कराड, हारूण शेख,तपास अधिकारी छाया देवरे, पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि.अहिल्यानगर ८७८८२१५०८६ भारत तांगडे,पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि.,नाशिक परिक्षेत्र, नाशिक,माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.,नाशिक परिक्षेत्र,नाशिक,सुनिल दोरगे अप्पर पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि.,नाशिक परिक्षेत्र नाशिक आदींनी कारवाई केली.
- Advertisement -

