Thursday, April 16, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा; ६६८ कोटींच्या अतिरिक्त निधीची मागणी..

गडचिरोली जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा; ६६८ कोटींच्या अतिरिक्त निधीची मागणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ष २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचे प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी दूरदृश्यप्रणालीद्वारे महत्त्वपूर्ण बैठक घेतली.या बैठकीत शासनाने निश्चित केलेल्या वित्तीय मर्यादेपेक्षा अधिक निधीची मागणी राज्यस्तरीय पातळीवर करण्यात आली.
जिल्ह्यासाठी वित्तीय मर्यादेत असलेली एकूण वार्षिक योजना मागणी ३७०.९७ कोटी रुपये इतकी आहे. मात्र विविध कार्यान्वयीन यंत्रणांकडून प्राप्त झालेली एकूण मागणी तब्बल १ हजार ३९ कोटी रुपये इतकी असून, राज्यस्तरीय बैठकीत ६६८.०३ कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी प्रस्तावित करण्यात आली आहे.यामध्ये पायाभूत सुविधा,शिक्षण,आरोग्य,सिंचन, आदिवासी विकास,औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीशी संबंधित महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा समावेश असल्याचे समजते.
मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित या बैठकीस वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल,शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर, मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव शिखर परदेशी तसेच वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओम प्रकाश गुप्ता उपस्थित होते.गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे,जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल,जिल्हा नियोजन अधिकारी प्रसाद घाडगे तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहून जिल्ह्याच्या गरजा व प्राधान्यक्रम मांडले.बैठकीदरम्यान सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी गडचिरोली जिल्ह्याकडे लोकसंख्येच्या दृष्टीने न बघता क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाहून जास्तीत जास्त निधी मंजूर करण्याबाबत मुख्यमंत्री यांच्याकडे शिफारस केली.विशेषतः दुर्गम व नक्षलप्रभावित भागांतील पायाभूत सुविधा,रस्ते, वीजपुरवठा,शिक्षण व आरोग्य सेवा बळकट करण्यावर भर देण्यासाठी निधीची आवश्यकता त्यांनी सांगितली. यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!