Thursday, September 10, 2026
Homeगडचिरोलीशेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या..

शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-एका ६२ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज,शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास गडचिरोली तालुक्याच्या पोर्ला गाव परिसरातील शेतशिवरात उघडकीस आली.गिरिधर कोलते वय ६२ वर्षे,रा.पोर्ला, ता.जि.गडचिरोली असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून शेतकरी गिरिधर कोलते हे आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास शेतावर गेले होते.दरम्यान,दुपारच्या सुमारास परिसरातील नागरिकांना शेत शिवारातील एका आंब्याच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आले. लागलीच घटनेची माहिती गावातील पोलिस पाटील हितेंद्र बारसागडे यांना देण्यात आली.बारसागडे यांनी गडचिरोली पोलिसांशी संपर्क साधून पोलिसांना पाचारण करण्यात आले.गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. गिरिधर कोलते यांचे पश्चात पत्नी,मुले असा आप्त परिवार असून आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.प्रकरणाचा पुढील तपास गडचिरोली पोलिस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप..!

उद्रेक न्युज वृत्त :-युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने उद्या,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी एक दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली...

राज्यस्तरीय ज्युनियर ‘कुंग फू’ स्पर्धेत वांगेपल्ली शाळेच्या मोहनला कांस्यपदक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पुणे येथे पार पडलेल्या २४ व्या राज्यस्तरीय 'ज्युनियर वुशू स्पर्धा-२०२६' मध्ये अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथील शासकीय निवासी शाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी...

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!