- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशातील विद्यापीठांत उच्चशिक्षण घेण्याची संधी मिळावी यासाठी आदिवासी विकास विभागाकडून शिष्यवृत्ती योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत सन २०२६-२७ शैक्षणिक वर्षासाठी ४० गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येणार आहे.
आदिवासी विकास विभागाकडून परदेशातील नामंकित विद्यापीठात प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या ४० विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्च भागविण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. शिष्यवृत्तीत शिक्षण व परीक्षा शुल्क, निर्वाह भत्ता (निवास व भोजन),शैक्षणिक आकस्मिक, इतर खर्च,विमान प्रवास खर्च,व्हिसा शुल्क व आरोग्य विमा यांचा समावेश आहे.शैक्षणिक आकस्मिक,इतर खर्च युएस व इतर देशांसाठी(युके वगळून)१ हजार ५०० युएस डॉलर तर युकेसाठी १ हजार १०० जीबीपी इत्यादी सुविधा दरवर्षी देण्यात येईल.लाभार्थी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपये तसेच विद्यापीठांची क्युएस वर्ल्ड रँकिंग मर्यादा २०० च्या आत असणे बंधनकारक आहे.विहित निकषांनुसार विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास लाभार्थी विद्यार्थ्यांच्या कुटुबांची उत्पन्न मर्यादा १० लाख रुपयांपर्यत शिथिल केली जाईल. क्युएस वर्ल्ड रँकिंग मर्यादा २०० पासून पुढे चढत्या क्रमाने ३०० पर्यत ग्राह्य धरण्यात येईल. इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी तात्काळ ऑनलाईन अर्ज https://fs.maharashtra.gov.in येथे करावेत, असे आवाहन आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी केले आहे.
- Advertisement -

