Friday, September 4, 2026
Homeगडचिरोलीतरुणाला गाळले जमिनीत; मृतदेहाचा काही भाग दिसल्याने कोरची तालुक्यात खळबळ..

तरुणाला गाळले जमिनीत; मृतदेहाचा काही भाग दिसल्याने कोरची तालुक्यात खळबळ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या आदिवासी,अतिदुर्गम भागातील कोरची तालुक्यात एक धक्कादायक घटना आज,सोमवार २ फेब्रुवारी सर्वत्र उघडकीस आली.एका अज्ञात तरुणाचा मृतदेह जमिनीत गाळलेला दिसून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.सदरची घटना कोरची तालुक्याच्या कोटरा-बोगाटोला मार्गावरील एका तलावाजवळ उघडकीस आली.घटनेची माहिती कोरची पोलिसांना मिळताच एपीआय मुकुंद देशमुख यांनी पथकासह घटनास्थळी धाव पाहणी केली असता एका अज्ञात तरुणाला तलावाजवळ जमिनीत गाळल्याचे दिसून आले.मृतदेहाचा काही भाग बाहेर असल्याने सदरचा प्रकार उघडकीस आला.मृतक तरुण हा २५ ते ३० वर्षे वयोगटातील असून शरीरावर पॅन्ट-शर्ट तर दोन्ही हातात कडे असल्याचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्यानंतर निदर्शनास आले.संपूर्ण शरीर काळपट पडल्याने काही दिवसांपूर्वीच त्याला जमिनीत गाळण्यात आले असावे,असा कयास बांधला जात आहे.विशेष म्हणजे,अज्ञात तरुणास जिवंत गाळण्यात आले की,मृत पावल्यानंतर? तो तलावाजवळ कसा काय आढळून आला,याबाबत कोरची पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!