Friday, June 19, 2026
Homeगडचिरोलीशाळेतील तब्बल ७० विद्यार्थ्यांना विषबाधा; ११ जणांची प्रकृती चिंताजनक..

शाळेतील तब्बल ७० विद्यार्थ्यांना विषबाधा; ११ जणांची प्रकृती चिंताजनक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत चालविण्यात येणाऱ्या शासकीय आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या तब्बल ७० विद्यार्थ्यांना अचानकपणे उलटी,मळमळ व तीव्र पोटदुखीचा त्रास सुरु झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.यातील ११ विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सदरचा प्रकार आज,बुधवार २८ जानेवारी रोजी भामरागड तालुक्याच्या लाहेरी येथील शासकीय आश्रम शाळेत उघडकीस आला.
लाहेरी शासकीय आश्रम शाळेत एकूण २३० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.२३० विद्यार्थ्यांपैकी तब्बल ७० विद्यार्थ्यांना दुपारच्या सुमारास अचानक उलटी, मळमळ व तीव्र पोटदुखीचा त्रास सुरु झाला.यामुळे उपस्थितांची भंबेरी उडाली आणि तात्काळ विद्यार्थ्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यानुसार,लाहेरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ३० विद्यार्थ्यांवर,तर भामरागड ग्रामीण रुग्णालयात ४० विद्यार्थ्यांवर उपचार सुरु करण्यात आले. यातील ११ विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तात्काळ पुढील उपचारार्थ अहेरी उपजिल्हा रुग्णालय भरती करण्यात आले.घटनेची माहिती मिळताच प्रकल्प अधिकारी अमर राऊत, तहसीलदार किशोर बागडे,सहाय्यक प्रकल्प अधिकारी रोशन चव्हाण यांच्यासह अधिकाऱ्यांनी तातडीने रुग्णालय व आश्रम शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व विद्यार्थ्यांच्या उपचाराबाबत आरोग्य विभागाला आवश्यक त्या सूचना दिल्या.विषबाधेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून जेवण वा पिण्याच्या पाण्यातून सदरचा प्रकार घडला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!