Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरपोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी चार पोलीस निलंबित; एका पोलीस उपनिरीक्षकाचा समावेश.. -...

पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी चार पोलीस निलंबित; एका पोलीस उपनिरीक्षकाचा समावेश.. – आरोपीने चादरीच्या सहाय्याने घेतला होता गळफास..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-शहराच्या जरीपटका पोलिस ठाण्याच्या कोठडीमध्ये(लॉकअप)आत्महत्या केल्याचे प्रकरण चांगलेच तापून आहे.अटकेतील १९ वर्षीय आरोपीने गुरुवार २२ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास कोठडीजवळ कुणीही नसल्याची संधी साधून त्याने चादरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.सकाळी सहा वाजता सदरची बाब उघडकीस येताच ठाण्यात एकच खळबळ उडाली.नागेंद्रकुमार रामजी भारतिया वय १९ वर्षे,प्रयागराज,उत्तर प्रदेश असे मृतकाचे नाव आहे.घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्यावर सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी,अप्पर आयुक्त राजेंद्र दाभाडे यांच्यासह परिमंडळ सहाचे पोलिस उपायुक्त संदीप पखाले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठाण्यात दाखल होत परिस्थितीची पाहणी केली.प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला होता.त्यातच,पोलिसांचा हलगर्जीपणा व तक्रादाराने मागितलेल्या पैशांमुळे तणावात येऊन मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे.दरम्यान, नागेंद्रच्या मृतदेहाचे काल शुक्रवारी न्यायिक दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले आणि मृतदेह कुटुंबाकडे सोपविण्यात आला.अश्यातच आता या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक व तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. घटनेच्या दिवशी रात्र पाळीत नितीन आत्राम,तर आरोपींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी अभय खडसे, प्रमोद दुधकवरे व राहुल चव्हाण यांच्यावर होती. प्राथमिकदृष्ट्या दोषी आढळल्यानंतर कर्तव्यावरील चौघांनाही तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. पोलिस कोठडीत मृत्यू झाल्याची घटना असल्याने पुढील तपास सीआयडी करत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!