Tuesday, August 18, 2026
Homeगोंदियापोलिस कर्मचाऱ्याचा कारनामा; चक्क महिलेशी करायचा अश्लील संभाषण.. - जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे...

पोलिस कर्मचाऱ्याचा कारनामा; चक्क महिलेशी करायचा अश्लील संभाषण.. – जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-ज्याच्याकडून रक्षणाची व न्यायाची अपेक्षा केली जाते,असे कार्यकर्तेच नाहक त्रास देऊ लागत असतील तर न्यायाची अपेक्षा करावी तरी कुणाकडेअसा प्रश्न निर्माण झाला आहे.अश्यातच गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव पोलिस ठाण्यातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे.येथील कार्यरत पोलिस कर्मचाऱ्याने चक्क त्याच तालुक्यातील एका महिलेशी भ्रमणध्वनीवर अश्लील संभाषण केल्याचा पुण्यप्रताप केला असून सहन करणारा कितीदा सहन करणार,प्रकरणी महिलेने जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय गाठून पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे.विशेष म्हणजे,गोरेगाव पोलीस ठाण्याने त्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव गुपित ठेवून निलंबनाचा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडे पाठविल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.महिलेशी अश्लील संभाषण करणारा पोलीस कर्मचारी संभाषणावरच थांबला नाही तर महिलेशी वारंवार संपर्क करून त्रासही दिला.या त्रासाला कंटाळून महिलेने ऑडिओ रेकॉर्डिंगसह जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केल्याची तालुक्यात चर्चा सुरू आहे.त्यामुळे तो पोलिस कर्मचारी कोण?अशी चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.महत्वाचे म्हणजे,पोलीस खाते हे संवेदनशील खाते आहे.या खात्याचा थेट संपर्क जनतेशी येतो.त्यामुळे चुकीचे वर्तन आणि तेही महिलेशी संबंधित असल्याने त्या पोलीस कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्याची मागणी सुजाण नागरिकांकडून केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अल्पवयीन मुलाने शाळकरी मुलाची केली हत्या..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-भंडारा शहरातून आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून एका शाळकरी मुलाच्या हत्येने संपूर्ण शहर हादरून...

सर्पदंश घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या वारसांना आणखी प्रत्येकी ५ लाखांचे अर्थसहाय्य मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थिनींच्या कायदेशीर वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५...

नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल; पोलिस यंत्रणा सतर्क.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपुरातील नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास शाळांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर दिसून येताच शिक्षण...

जिल्हाधिकारी व एसपी रात्रीच पोहचले मार्कंडा देवस्थान परिसरात; विकास व संवर्धन कामांची केली पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थान परिसरात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग(एएसआय) यांच्यामार्फत सुरू असलेल्या कामांची जिल्हाधिकारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!