Monday, May 25, 2026
Homeनागपूरलग्न करण्यास नकार देणाऱ्या तरुणाला बलात्काराच्या गुन्ह्यात फसवले.. -न्यायालयाकडून निर्दोष सुटका..

लग्न करण्यास नकार देणाऱ्या तरुणाला बलात्काराच्या गुन्ह्यात फसवले.. -न्यायालयाकडून निर्दोष सुटका..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-सुरुवातीला दोघांची चांगली मैत्री होती.मैत्रीण सुशिक्षित असून अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती.काही कालावधीत मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.त्यानंतर,२५ वर्षीय तरुणाने लग्नाचे वचन देत लैंगिक संबंध प्रस्थापित केले.लग्न करण्यास नकार दिल्याने तरुणीने बलात्काराच्या गुन्ह्यात फसवले होते, पण तरुणाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतल्याने तो या गंभीर प्रकरणातून बचावला आहे.उच्च न्यायालयाने रेकॉर्डवरील विविध बाबी लक्षात घेता बलात्कारासह इतर संबंधित गुन्ह्यांचा वादग्रस्त एफआयआर व खटला रद्द केला आहे. सोलेमानराजू चोलांगी वय २५ वर्षे,असे तरुणाचे नाव असून तो नागपूर जिल्ह्याच्या मौदा तालुक्यातील कोडामेंढी येथील रहिवासी आहे.त्याची प्रेयसी अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती.तिने सोलेमानराजूविरोधात ५ एप्रिल २०२२ रोजी रामटेक पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.मैत्रीण व सोलेमानराजू २०२२ पासून सतत संपर्कात होते व यांचे एकमेकांवर प्रेम होते.सोलेमानराजूने लग्न करण्याचे वचन देऊन २८ ऑगस्ट २०२० रोजी पहिल्यांदा तरुणीवर बलात्कार केला.त्यानंतरही त्याने तिच्यासोबत वारंवार शरीरसंबंध ठेवले व पुढे चालून तरुणीला टाळणे सुरू केले आणि लग्न करण्यास नकार दिला,असा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.पोलिसांनी त्याची दखल घेऊन वादग्रस्त एफआयआर नोंदवला होता.१६ मे २०२२ रोजी जिल्हा सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता.त्याविरुद्ध सोलेमानराजूने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.त्यावर न्यायमूर्तिद्वय उर्मिला जोशी-फलके व नंदेश देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली.यात तरुणा विरोधात ठोस पुरावे आढळून आले नसल्याने व उलट तरुणी त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत असल्याचे स्पष्ट झाल्याने बलात्कारासह खटला रद्द करण्यात आला.
सोलेमानराजूतर्फे ॲड.राजू कडू व ॲड.विकास गडपायले यांनी कामकाज पाहिले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्ण लहरींचा इशारा; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-हवामान विभाग,प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात  काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात...

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या...

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!