Monday, August 31, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तलाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.. अर्ज भरतांना किंवा ई-केवायसी करतांना झालेल्या चुका सुधारण्यासाठी...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.. अर्ज भरतांना किंवा ई-केवायसी करतांना झालेल्या चुका सुधारण्यासाठी संधी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ ही राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ घेणाऱ्या बहुतांश लाभार्थी महिला या ग्रामीण आणि दुर्गम भागातील आहेत.अनेकदा तांत्रिक माहितीचा अभाव, नेटवर्कच्या समस्या किंवा घाईगडबडीमुळे ई-केवायसी करतांना महिलांकडून चुका झाल्याचे सरकारच्या निदर्शनास आले.अशा चुकांमुळे अनेक पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर,ई-केवायसीमध्ये सुधारणा करण्याची संधी मिळावी,अशी मागणी करणारी अनेक निवेदने महिला व बालविकास विभागाला प्राप्त झाली होती.या मागण्यांची गंभीर दखल घेत आणि महिलांच्या सोयीसाठी सरकारने संवेदनशील निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाखो लाभार्थी महिलांना मोठा दिलासा देत अर्ज भरतांना किंवा ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करतांना अनावधानाने झालेल्या चुका सुधारण्यासाठी आता राज्य सरकारने अंतिम संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार,लाभार्थी महिलांना आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ई-केवायसीमधील त्रुटी दुरुस्त करता येणार असल्याचे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले आहे.३१ डिसेंबरपर्यंत पोर्टलवर जाऊन महिलांना त्यांच्या ई-केवायसी अर्जात ‘एकदाच’ सुधारणा करता येईल,सदरची शेवटची संधी असल्याने महिलांनी काळजीपूर्वक माहिती भरावी,असेही आवाहन करण्यात आले आहे.केवळ केवायसी नोंदणीसाठी मुदतवाढच नाही,तर विभागाने आणखी एक महत्त्वपूर्ण तांत्रिक बदल केला आहे.ज्या लाभार्थी महिलांचे पती हयात नाहीत किंवा ज्यांचे वडील हयात नाहीत,अशा महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करतांना अनेक अडचणी येत होत्या.या समस्येचे निराकरण करण्यासाठी आता पोर्टलवर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.त्यामुळे या घटकातील महिलांनाही आता आपली नोंदणी प्रक्रिया  पूर्ण करता येणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!