Sunday, April 19, 2026
Homeगडचिरोलीमाय मराठीचा झेंडा.. तेलंगणाच्या हैदराबाद येथे कवी प्रभाकर दुर्गे राष्ट्रीय काव्यरत्न पुरस्काराने...

माय मराठीचा झेंडा.. तेलंगणाच्या हैदराबाद येथे कवी प्रभाकर दुर्गे राष्ट्रीय काव्यरत्न पुरस्काराने सन्मानित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-विश्वात्मक मराठी साहित्य कट्टा व अखिल महाराष्ट्र पत्रकार,पत्रलेखक संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने नुकतेच तेलंगणा राज्याच्या हैदराबाद येथे  पार पडलेल्या राष्ट्रीय बहुभाषिक काव्य संमेलनात गडचिरोली जिल्ह्याच्या मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली चक या खेडे गावचे युवा विद्रोही कवी प्रभाकर देविदास दुर्गे(छायासुत) यांना राष्ट्रीय काव्यरत्न पुरस्कार २०२५ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.सदर कार्यक्रमात विविध राज्यातून आपापल्या मातृभाषेचा गौरव करण्याकरीता संपूर्ण देशभरातील साहित्यिकांची उपस्थिती होती.त्यात कवी प्रभाकर देविदास दुर्गे (छायासुत)यांचा देखील सहभाग होता.त्यांनी ‘शेतकऱ्याची दिवाळी’ ही जिवंत कविता सादर करत संपूर्ण देशभरातील आलेल्या साहित्यिक,रसिकांची मने जिंकत माय मराठीचा झेंडा रोवला.
सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा.डॉ.विद्या देवधर(सुप्रसिद्ध लेखिका हैदराबाद),डॉ.जयलक्ष्मी सानिपिना(इंटरनॅशनल आयकॉन),सदानंद येलगंटी (सुप्रसिद्ध साहित्यिक कर्नाटका),ज्योती पांका (आंतरराष्ट्रीय स्कूल,कॉलेज संस्थापिका,सुप्रसिद्ध कवयित्री अरुणाचल प्रदेश),प्रफुल केवट(सुप्रसिद्ध साहित्यिक आसाम)अध्यक्षीय मंडळ प्रमुख हेमलता गीते व या संस्थेचे सर्वेसर्वा शिवराज पाटील व विविध मान्यवर उपस्थित होते.कवी प्रभाकर दुर्गे यांच्या सन्मानाबद्दल कुटूंबीय,सहकारी मित्र-मैत्रिणी,गाववासीय जनता तसेच संपूर्ण महाराष्ट्रभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!