गोंदिया :-नुकतेच मंगळवार २ डिसेंबरला गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा नगरपंचायतीचे मतदान पूर्ण झाल्यानंतर सील झालेल्या ईव्हीएम मशीन स्ट्राँगरुममध्ये उघडून पुन्हा सील करण्यात आल्या.यामुळे उमेदवार आणि प्रतिनिधींनी तहसील कार्यालयावर हल्लाबोल केला,ज्यामुळे वातावरण तापले.निवडणूक आयोगाला अहवाल पाठवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी तहसीलदार मोनिका कांबळे यांची उचलबांगडी करत कारभार अर्जुनी मोरगावचे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांच्याकडे सोपविला. सालेकसा नगरपंचायतीचे १७ नगरसेवक आणि एका नगराध्यक्षासाठी मंगळवारी मतदान घेण्यात आले. मतदानानंतर ईव्हीएम मशीन पंचासमक्ष सील करण्यात आल्या.त्या पेट्या सालेकसा तहसील कार्यालयातील स्ट्रॉगरूममध्ये नेण्यात आल्या.त्यानंतर मशीन बंद आहे की सुरू हे तपाण्याकरीता निवडणूक विभागाने कोणत्याही पक्षाच्या प्रतिनिधींनी किंवा उमेदवारांना पाचारण न करता परस्पर सील उघडून पुन्हा सील केले.त्यामुळे उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मनात संशय बळावला. सालेकसा नगरपंचायतीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड प्रकरणावरून काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना शिंदे गट,शिवसेना या उद्धव गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांनी तहसील कार्यालयामध्ये घेराव करून याविषयी स्पष्टीकरण मागितले होते.त्यावरून जवळपास १२ तास आंदोलन करण्यात आले.त्यानंतर रात्री उशिरा प्रकरणातील अहवाल हा उपविभागीय अधिकाऱ्यांनी तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला आणि राज्य निवडणुकीला आयोगाला पाठवण्यात आला.त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोग यावर कोणते निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. परंतु स्थानिक काँग्रेस नेत्यांनी ईव्हीएममध्ये छेडछाड करून वोट टेम्परिंग तर झाली नाही ना असा संशय व्यक्त केला. कॉंग्रेसचे बबलू कटरे यांनी तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांच्यामार्फत या प्रक्रियेत सहभागी असलेल्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली.त्यात निवडणूक अधिकाऱ्यांवर आणि उपविभागीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.या दबावापोटी दुपारनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सालेकसाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मोनिका कांबळे यांची उचलबांगळी करत त्यांच्याऐवजी अर्जुनी मोरगावचे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांच्याकडे सालेकसाचा प्रभार सोपविला.मात्र प्रभार काढून नव्हे,तर तात्काळ निलंबन व्हावे या विषयात उपविभागीय अधिकाऱ्यांसह तहसीलदार,सालेकसा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी आणि या प्रक्रियेत जे कोणी सहभागी आहेत,त्या सर्वांचे निलंबन करून निवडणूक पुन्हा घेण्यात यावी,अशी मागणी तक्रारीतून करण्यात आली.
सील झालेल्या ईव्हीएम मशीन स्ट्राँगरुममध्ये उघडून पुन्हा सील.. – तहसील कार्यालयावर हल्लाबोल..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

