Tuesday, July 14, 2026
Homeनागपूरमाहिती अधिकारात माहिती देण्यास टाळाटाळ; ग्रामसेवकास २५ हजाराचा दंड..

माहिती अधिकारात माहिती देण्यास टाळाटाळ; ग्रामसेवकास २५ हजाराचा दंड..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपुर :-माहिती अधिकार अर्जाद्वारे माहिती मागूनही प्रतिसाद न देणे,वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना करणे तसेच राज्य माहिती आयोगाच्या सुनावणीस अनुपस्थिती दर्शवून अनास्था दर्शविणाऱ्या ग्रामसेवकास राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठातर्फे चांगलीच चपराक बसली आहे.प्रकरणी आयोगाने नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तथा जन माहिती अधिकारी बबन श्रृंगारे यांना २५ हजार रुपयांचा दंड  ठोठावला आहे.
अगोदरच माहिती अधिकार अर्जाद्वारे मागितलेली माहिती दिली जात नसल्याने राज्य माहिती आयुक्त कार्यालयात तब्बल दोन ते तीन वर्षानंतर सुनावणी होऊन आदेश पारित करण्यात येतो.अश्यातही माहिती दिली जात नाही.अश्याच प्रकारे रवींद्र हटकर यांनी माहिती अधिकार अर्जाद्वारे १३ जानेवारी २०२२ रोजी ग्रामपंचायतीकडे माहिती मागितली होती.मात्र, ग्रामसेवक यांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्याने हटकर यांनी प्रथम अपील दाखल केले.प्रथम अपिलीय अधिकारी,पंचायत समिती सावनेर यांनी २२ एप्रिल २०२२ रोजी विहित मुदतीत आणि मोफत माहिती द्यावी,असा आदेश दिला.तरीही श्रृंगारे यांनी आदेशाची अंमलबजावणी केली नाही.यामुळे हटकर यांनी राज्य माहिती आयोगात द्वितीय अपील (क्र.९८०/२०२२) दाखल केले.आयोगाने २४ जून २०२४ रोजी जारी केलेल्या अंतरिम आदेशात दंडात्मक कारवाई का करू नये? असा सवाल विचारून व्यक्तिगत उपस्थितीची नोटीस बजावली होती.तरीही अनुपस्थित राहून आदेशाचे उल्लंघन, अधिकाऱ्यांकडून झालेला विलंब आणि कामावरील अनास्था अधोरेखित करत आयोगाने माहिती अधिकार कायदा २००५ च्या कलम २०(१) व १९ (८) (ग) नुसार २५ हजार रुपयांचा दंड ठोठावून सदरची
 रक्कम ही ग्रामसेवकाच्या वेतनातून वसूल करून शासकीय कोषागारात जमा करण्याचे आदेश दिलेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!