Monday, July 13, 2026
Homeगोंदियाअल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढले.. - बापाचा मुलीवर अत्याचार; शाळेचा मुख्याध्यापक...

अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढले.. – बापाचा मुलीवर अत्याचार; शाळेचा मुख्याध्यापक आणि शिक्षकाचे विद्यार्थिनींशी अश्लील चाळे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-केवळ गोंदिया जिल्ह्यातच नव्हे तर सर्वत्र अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढलेले आहेत. अश्यातच गोंदिया जिल्ह्यात चालू महिन्यात एक अत्याचाराची तर दोन गैरवर्तणुकीच्या घटना उघडकीस आल्या आहेत.पहिली घटना वडिलांच्या पवित्र्य नात्याला काळीमा फासणारी घटना आहे,तर दुसऱ्या घटनेत एका मुख्याध्यापकाने तब्बल सात विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केले,तर तिसऱ्या घटनेत एका खासगी विद्यालयातील एका शिक्षकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी वर्गातच अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या डुग्गीपार पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावात वडिलांनीच आपल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.४० वर्षीय आरोपीची पत्नी मागील दहा वर्षापासून माहेरी राहते.त्यामुळे आरोपीसोबत घरात मुलगी,मुलगा आणि आरोपीची आई राहत होते.मुलगी लहान असल्याने बापासोबतच झोपत होती आणि याचाच फायदा घेत आरोपी बापाने विकृतपणे तिच्यावर अत्याचार केला.काही महिन्यांपासून पोटात अस्वस्थता जाणवल्यानंतर मुलीला महिला रुग्णालयात नेण्यात आले.तपासणीदरम्यान मुलगी गर्भवती असल्याचा धक्कादायक खुलासा झाला. डुग्गीपार पोलिस ठाण्यात आरोपी बापावर लैंगिक बाल शोषण प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी नराधम बापाला बुधवार १९ नोव्हेंबरला अटक करण्यात आली व न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दुसरी घटना सडक-अर्जुनी तालुक्याच्या घाटबोरी कोहळी येथील हायस्कूलमध्ये घडली.मुख्याध्यापकाने
तब्बल सात विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्या प्रकरणी मुख्याध्यापकावर डुग्गीपार पोलिस ठाण्यात विनयभंगाचा व बाललैंगिक अत्याचार अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.५२ वर्षीय कोमेद कापगते रा.मुंगली,ता.सडक-अर्जुनी असे आरोपी मुख्याध्यापकाचे नाव आहे.तो शाळेतीलच विद्यार्थिनींशी मागील वर्षभरापासून अश्लील चाळे करत होता.याची तक्रार संस्था संचालकांकडे गेल्याने संस्था संचालकांनी त्याच्याविरोधात डुग्गीपार पोलिस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीवरून १५ नोव्हेंबर रोजी डुग्गीपार पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार अधिनियम कलम ८,१२, भारतीय न्याय संहिता कलम ७५, ७९ तसेच ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.आरोपी मुख्याध्यापकाला १६ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती.आता त्याची रवानगी भंडारा येथील तुरूंगात करण्यात आली आहे.
तिसरी घटना अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील एका खासगी विद्यालयात घडली आहे.एका शिक्षकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी शिकवित असतांनाच वर्गातच अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.आई-वडिलांनी १९ नोव्हेंबर रोजी नवेगावबांध पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.पालकांच्या तक्रारीनंतर या प्रकरणी सुरेश फागुजी बाळबुद्धे या शिक्षकावर नवेगावबांध पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारीवरून कलम ७४,७५ (२),७९ बीएनएस ८,१२ लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा,२०१२ (पोस्को) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पोलीस चौकशी सुरू असून शिक्षक फरार झाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!