- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-गडचिरोली तालुक्याच्या धुंडेशिवणी गावातील हनुमान मंदिरापासून ते अमिर्झा पर्यंत मुख्य रस्त्याची दुरावस्था झाल्याने मार्गावरून आवागमन करणाऱ्या वाहनधारक,शालेय विद्यार्थी तसेच ग्रामस्थांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.मुख्य मार्गावर मोठ मोठे-खड्डे पडून निकृष्ट दर्जाचे बांधकाम केलेले डांबरीकरण पूर्णतः उखडून गेल्याने मार्गाची पुरती वाट लागलेली असतांनाही याकडे स्थानिक प्रशासन तसेच संबंधित विभाग कानाडोळा करून नागरिकांच्या जीवावर उठले की काय?असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे.
धुंडेशिवणी व परिसरातील नागरिकांसाठी अमीर्झा गाव हे बाजारपेठेसाठी तसेच शालेय विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक शिक्षण घेण्यासाठी सोयीचे असल्याने या ठिकाणी दररोज बोळण झालेल्या मार्गावरून ये-जा करावी लागते.मार्गावर खड्डे पडल्याने सायकल चालविणारे शालेय विद्यार्थी तसेच वाहनधारकांना वाट शोधून ‘इकडून ती तिकडून’ असे म्हणत मार्गक्रमण करावे लागत आहे.बऱ्याच कालावधीपासून रस्त्याची जैसे थे अवस्था,त्याचबरोबर आणखी खड्डेमय रस्ता होत असल्याने सदरच्या मार्गावरून एखादेवेळी अपघात वा इतर अनुचित प्रकार घडू नयेत,यासाठी धुंडेशिवणी ते अमिर्झा मार्गाची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
- Advertisement -

