Friday, August 28, 2026
Homeनागपूरअज्ञात ट्रकची दुचाकीला धडक; तरुणाचा जागीच मृत्यू..

अज्ञात ट्रकची दुचाकीला धडक; तरुणाचा जागीच मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-मित्रासह दुचाकीने जात असतांना एका अज्ञात ट्रकने मागून दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार चालक तरुण जागीच ठार झाला,तर त्याच्या पाठीमागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारच्या रात्री हिंगणा एमआयडीसी कॅम्पस परिसरात घडली.अपघातात जहीन कुरेशी वय २० वर्षे, रा.ता.लाखनी,जि.भंडारा हा तरुण जागीच ठार झाला.जहीन हा नागपूरच्या रायसोनी कॉलेजमध्ये अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता.जहीन हा एका मित्रासोबत जेवण केल्यानंतर रात्री उशिरा दुचाकीने त्याच्या वसतिगृहात जात होता.हिंगणा एमआयडीसी कॅम्पस परिसरात येताच एका अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.यात दोघेही खाली कोसळले.जहीनच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर पाठीमागे बसलेला मित्र गंभीर जखमी झाला.जखमी विद्यार्थ्याला तात्काळ लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.प्रकरणी पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून ट्रक आणि चालकाचा शोध सुरू केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!