Sunday, July 12, 2026
Homeनागपूरस्त्री-भ्रूण हत्येला प्रोत्साहन देणाऱ्या दोन 'व्हाइट कॉलर' डॉक्टरांचा पर्दाफाश...

स्त्री-भ्रूण हत्येला प्रोत्साहन देणाऱ्या दोन ‘व्हाइट कॉलर’ डॉक्टरांचा पर्दाफाश…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपूर महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्ट्रिंग ऑपरेशन राबवून स्त्री-भ्रूण हत्येला प्रोत्साहन देणाऱ्या दोन ‘व्हाइट कॉलर’ डॉक्टरांचा मनपाच्या आरोग्य पथकाने पर्दाफाश केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.गर्भलिंग निदान करणे हा ‘गर्भलिंग निदान व प्रसूतीपूर्व चाचणी'(पीसीपीएनडीटी) कायद्यान्वये गंभीर गुन्हा आहे.मात्र,या कायद्याला धाब्यावर बसवून नागपुरातील दोन डॉक्टर्स छुप्या पद्धतीने हे काम करत होते.या गंभीर गुन्ह्याचा पर्दाफाश करण्यासाठी मनपाच्या आरोग्य विभागाने एक धडाकेबाज स्टिंग ऑपरेशन केले आणि दोन बड्या डॉक्टरांना रंगेहाथ पकडले आहे.
मनपाच्या आरोग्य पथकास बेकायदा लिंगनिदानाबाबत गोपनीय माहिती मिळाली होती.त्या आधारावर आरोग्य विभागाने स्टिंग ऑपरेशन करण्याची योजना आखली.वर्धमाननगर येथील डॉ.रेखा शिरसाट (बीएएमएस)यांच्या शिवम हॉस्पिटलमध्ये एका ‘डमी’ गर्भवती पेशंटला पाठविण्यात आले.डमी पेशंटने डॉ.शिरसाट यांच्याकडे गर्भातील बाळाचे लिंगनिदान करण्याची विचारणा केली.प्रथमतः त्यांनी नकार दिला, परंतु नंतर या चाचणीसाठी तब्बल ६० हजार रुपयांची मागणी केली.महिला पेशंटने पुन्हा डॉक्टरांची भेट घेतली आणि चाचणीसाठी पैसे देण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर डॉक्टरांनी पेशंटला दुसरीकडे सोनोग्राफीसाठी पाठवले जाईल,असे सांगितले.स्टिंग ऑपरेशनच्या पहिल्या दिवशी,शुक्रवार १४ नोव्हेंबर रोजी त्या डमी पेशंटने शिवम हॉस्पिटलमध्ये हजेरी लावली.तेथे प्रथम ५० हजार रुपये जमा केले.यानंतर,एका एजंटने पेशंटला बाइकवर बसवून आठ सदर परिसरात नेले.पहिल्या दिवशी चाचणी न झाल्याने पैसे परत करण्यात आले. दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल शनिवारी एजंटने पुन्हा महिला पेशंटला बाइकवर बसवून सदर येथील सराफा चेंबरमधील डॉ.राजीव नागी यांच्या सोनोग्राफी सेंटरवर नेले.लिफ्ट बंद असल्यामुळे पेशंटला तीन मजले इमारत पायी चालत क्लिनिकपर्यंत जावे लागले.तिथे डॉ.नागी यांनी महिला पेशंटला गर्भातील बाळाचे लिंग तपासून सांगितले. यानंतर,एजंटने पेशंटला पुन्हा बाइकवरून शिवम हॉस्पिटलमध्ये नेले.हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर,महानगर पालिकेच्या पथकाने तातडीने पोलिसांना सोबत घेऊन डॉ.नागी यांच्या क्लिनिकवर धाव घेतली.मात्र,क्लिनिक बंद आढळले.डॉ.नागी यांना फोनद्वारे संपर्क साधला असता,ते ‘आउट ऑफ स्टेशन’ असल्याचे कळले.यानंतर मनपाच्या चमूने पोलिसांच्या मदतीने तात्काळ त्यांचे सोनोग्राफी सेंटर सील करून गुन्हे दाखल करण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना दणका; निलंबनासह विभागीय चौकशीचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालयात वारंवार गैरहजर राहणे,परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकांना अनुपस्थित राहणे,रजेचे अर्ज विहित नमुन्यात व वेळेत सादर न करणे,वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना...

देसाईगंजच्या विहीरगाव(पोटगाव)येथील ‘त्या’ मातेने रुग्णवाहिकेतच दिला गोंडस मुलीला जन्म..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव(पोटगाव)येथील रहिवासी स्वाती चांगदेव नेवारे ह्या माहेरी बाळंतपणासाठी गेल्या असता  आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेद्वारे गोंदियाला रेफर करत असतांनाच काही अंतरावरील मार्गावर...

कुरुडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे शासन स्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यात येतील,अशी ग्वाही आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!