Thursday, September 10, 2026
Homeगडचिरोलीशालेय विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन..

शालेय विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली तर्फे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या समान किमान कार्यक्रमांतर्गत,गडचिरोली तालुक्याच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कोटगल येथे कायदेविषयक शिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात विद्यार्थ्यांना बाल दिन साजरा करणे,बालकांसाठी बालस्नेही कायदेशीर सेवा,सायबर गुन्हे,बालकांचे अधिकार,मादक पदार्थांचे सेवन, शिक्षणाचा अधिकार आणि शाळांमध्ये पॉक्सो कायदा यासारख्या महत्त्वाच्या कायदेविषयक बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक ॲड.वाय.एन.चेके, सहाय्यक न्यायरक्षक,न्यायरक्षक कार्यालय गडचिरोली यांनी बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा-२०१२ आणि मादक व अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांसाठी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीच्या उपाययोजना यावर सविस्तर मार्गदर्शन केले.त्यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी जारी केलेला टोल फ्री क्रमांक १५१०० याचीही माहिती दिली.शिबिराच्या अध्यक्षस्थानी असलेले अं.पुं.खानोरकर सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना,मुलांकरीता असलेल्या मोफत कायदेशीर सेवा, बालकांचे अधिकार आणि राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांची आशा व डॉन(DAWN) योजना यावर मार्गदर्शन केले.त्यांनी बालक दिनाच्या उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या.यावेळी श्रीमती अल्का जुआरे मुख्याध्यापिका तसेच राजेश चिलमवार विषय शिक्षक आणि श्रीमती हिरा दुंधलवार शिक्षिका जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोटगल हे उपस्थित होते.शाळेतील सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोटगल येथील शिक्षिका हिरा दुंधलवार यांनी केले,तर उपस्थितांचे आभार राजेश चिलमवार यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोटगल येथील सर्व शिक्षक वृंद,कर्मचारी आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली येथील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

उद्याला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप..!

उद्रेक न्युज वृत्त :-युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने उद्या,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी एक दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!