Friday, September 11, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच पक्षांमध्ये 'इनकमिंग-आउटगोइंग' ची क्रेझ..

निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच पक्षांमध्ये ‘इनकमिंग-आउटगोइंग’ ची क्रेझ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच राज्याच्या अनेक शहरात निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे.येत्या,२ डिसेंबर रोजी मतदान होणार असून नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे.या तारखेनंतर उमेदवारांना केवळ पाचच दिवस प्रचारासाठी उपलब्ध राहणार असल्याने प्रत्येक उमे‌द्वाराला मतदारांच्या घराघरांत पोहोचण्यासाठी अक्षरशः धावपळ करावी लागणार आहे.नामनिर्देशन परत घेण्याची मुदत २५ नोव्हेंबरपर्यंत असून,उमेदवार ‘होम टू होम’ संपर्कासाठी नियोजनबद्ध रणनीती आखत आहेत. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच प्रमुख पक्षांमध्ये ‘इनकमिंग-आउटगोइंग’ ची क्रेझ वाढली आहे. काही इच्छुकांनी पक्षांतराचा मार्ग स्वीकारला,तर काहींनी स्वतंत्र उमेदवारीचा पर्याय निवडला आहे.सध्या राजकीय वातावरण तापले आहे.नगराध्यक्ष पदासाठी एकाच पक्षातून अनेक इच्छुक स्पर्धेत असल्याने बंडखोरीचे सावट दाटले आहे.नेत्यांना बंडखोरी थोपविण्यासाठी कसरत करावी लागत असून,काही पक्षांनी अंतिम उमेदवारी अद्याप गुलदस्त्यात ठेवली आहे.त्यामुळे अंतर्गत असंतोष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.सध्या बहुतेक पक्षांत उमेदवार ठरविण्याची घाई सुरू आहे.सध्या स्थितीत व्हॉट्सॲप ग्रुप,फेसबुक, इन्स्टाग्रामवरील पोस्ट आणि प्रभाग पातळीवरील भेटींचे कार्यक्रम हे उमेदवारांच्या प्रचाराची मुख्य साधने बनली आहेत. मतदारांशी थेट संवाद साधणे आणि वैयक्तिक नाते बांधणे हेच प्रचाराच्या रणनीतीचे मूळ ध्येय राहिले आहे.प्रत्येक प्रभागात संघर्षपूर्ण लढत अपेक्षित असल्याने उमेदवारांसाठी प्रत्येक मत महत्वाचे ठरणार आहे.यावेळेस बाजी कोण मारणार,हे निश्चित नसले तरीही काहीजण आम्हीच खरे नेते ठरणार आहोत; अशी अनेकांची मनधारणा झाल्याचे दिसून येते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!