Sunday, August 30, 2026
Homeगडचिरोलीअवैध रेती प्रकरण भोवले; दोन विकेटी नंतर तिसरी विकेट तहसिलदाराची..

अवैध रेती प्रकरण भोवले; दोन विकेटी नंतर तिसरी विकेट तहसिलदाराची..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-अवैध रेती उत्खनन प्रकरणी जिल्ह्यात पहिल्यांदाच दोन विकेटी अन् एक तहसीलदार रांगेत उभे असल्याची घटना १५ ऑक्टोंबर २०२५ रोजी उघडकीस आली होती.गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यात अवैध रेती उत्खनन आणि गौण खनिज वाहतुक प्रकरणी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी मंडळ अधिकारी राजू गणपतराव खोब्रागडे आणि तलाठी अश्विनी सडमेक यांना बुधवार १५ ऑक्टोंबर २०२५ रोजी निलंबित करून तहसीलदार निलेश होनमोरे यांच्यावर निष्काळजीपणा आणि नियंत्रण न ठेवल्याबद्दल कारवाई करून बदली करण्याची शिफारस विभागीय आयुक्तांकडे केली होती.अश्यातच आता तहसिलदारांची पोलखोल झाल्याने सिरोंचा तहसील कार्यालयाचे तहसीलदार नीलेश होनमोरे यांनाही निलंबित करण्यात आले आहे.शासनाचे अवर सचिव प्रवीण पाटील यांनी काल,शुक्रवार ७ नोव्हेंबरला निलंबन आदेश जारी केले आहे.विशेष म्हणजे,तलाठी अश्विनी सडमेक यांनी अवैध रेती उत्खनन तथा साठा प्रकरणी तहसीलदार यांना लागोपाठ सहा अहवाल दिले होते. मात्र,त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.त्यातच तलाठी आणि मंडळाधिकाऱ्यांवर कारवाई करून वरिष्ठांचा बचाव केल्याचा आरोप करून तलाठी संघटनेने आंदोलन पुकारले होते.
  • काय आहे प्रकरण👇
गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यात सप्टेंबर २०२५ मध्ये अवैध रेती उत्खनन करून वाहतुक केली जात होती.याबाबत विविध प्रसारमाध्यमांनी बातम्या प्रसारित करून अवैध रेती चोरी उघड आणण्याचा प्रयत्न केला असता जिल्हा खनिकर्म अधिकारी इम्रान शेख यांनी तातडीने खुलासा करून गैरव्यवहार नसल्याचा दावा केला होता.मात्र,जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी अहेरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले होते.त्यानुसार, २ ऑक्टोंबर २०२५ रोजी मौजा-मद्दीकुंठा व चिंतरेवला या रेतीघाटांवर करण्यात आलेल्या मौका चौकशीत तब्बल १५ हजार ६६५ ब्रास अवैध रेती साठा आढळून आला व दोन जेसीबी,एक पोकलँड मशिन आणि पाच ट्रक रेती उत्खनन व वाहतुकीसाठी वापरले जात असल्याचे निष्पन्न झाले होते.त्यासाठी २९ कोटीपेक्षा अधिक रकमेचा दंड प्रस्तावित करण्यात आला.चौकशीत महसूल कर्मचाऱ्यांची निष्क्रियता स्पष्ट झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार निलेश होनमोरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आणि कारवाई करून बदली करण्याची शिफारस नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्याकडे केली होती.दरम्यान, महसूल विभागाच्या शासन निर्णयानुसार ग्राम महसूल अधिकारी(तलाठी) यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील वाळूगटाची नियमित पाहणी करून अवैध उत्खननाबाबत वरिष्ठांना अहवाल देणे अपेक्षित असते. मात्र,अश्विनी सडमेक यांनी ही जबाबदारी पार पाडण्यात दुर्लक्ष केल्याचे चौकशीत दिसून आले.तसेच मंडळ अधिकारी राजू गणपतराव खोब्रागडे यांनी देखील रेतीघाटाची पाहणी व दैनंदिन नोंद ठेवण्यात कसूर केल्याचे आढळले.त्यामुळे दोघांनाही जिल्हाधिकाऱ्यांनी १५ ऑक्टोंबर २०२५ रोजी तात्काळ निलंबित केले होते.मात्र,अवैध रेती उत्खनन होत असतांना तलाठी सडमेक यांनी तहसीलदारांना पत्रानिशी कळवले होते.पण,तहसीलदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळेच अवैध रेती प्रकरणी दोन विकेटी नंतर तिसरी विकेट तहसिलदाराची गेली.प्रकरणात आता विभागीय चौकशी होणार असून निलंबित तहसीलदार निलेश होनमोरे यांना जिल्हाधिकारी कार्यालय मुख्यालय देण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!