Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीआशीर्वाद हॉस्टेलवर महिला व बाल विकास विभागाची कारवाई; तब्बल ९१ बालकांची सुटका..

आशीर्वाद हॉस्टेलवर महिला व बाल विकास विभागाची कारवाई; तब्बल ९१ बालकांची सुटका..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महिला व बाल विकास आयुक्तालयाच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात अनधिकृतरित्या चालविण्यात येणाऱ्या आशीर्वाद हॉस्टेल,नागेपल्ली(आय.टी.आय. जवळ)या संस्थेवर आज,मंगळवार ४ नोव्हेंबरला कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण ९१ बालकांना (४९ मुली व ४२ मुले) सुरक्षितपणे ताब्यात घेऊन शासन मान्यताप्राप्त वसतीगृहांमध्ये दाखल करण्यात आले.जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व अहेरीचे उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी कुशल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू,अहेरीचे तहसीलदार तथा तालुका बाल संरक्षण समिती अध्यक्ष बालाजी सोमवंशी,बाल कल्याण समिती सदस्य दिनेश बोरकुटे,जिल्हा परिविक्षा अधिकारी विनोद पाटील,जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले,सामाजिक कार्यकर्ते जयंत जथाडे व क्षेत्र कार्यकर्ता निलेश देशमुख तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या पथकाने ही कारवाई केली.बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण)अधिनियम २०१५ व सुधारित अधिनियम २०२१ तसेच महाराष्ट्र राज्य बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण)नियम २०१८ नुसार, कोणतीही संस्था योग्य मान्यता व नोंदणीशिवाय बालकांचे संगोपन करू शकत नाही.सदर हॉस्टेलकडे आवश्यक नोंदणी प्रमाणपत्र नसल्याचे निष्पन्न झाल्याने ही कारवाई करण्यात आली.या अधिनियमाच्या कलम ४२ नुसार अशा संस्थांचे संचालन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कारावास आणि आर्थिक दंड यांची तरतूद आहे.
स्थळपरीक्षण आणि पंचनामा👇
 
महिला व बाल विकास विभागाच्या पथकाने तहसीलदार अहेरी यांच्या उपस्थितीत नागेपल्ली येथील हॉस्टेलला भेट देऊन तपासणी केली. तपासणीदरम्यान ४८ मुली आणि ४२ मुले अशा एकूण ९० पेक्षा अधिक बालकांचे वास्तव आढळले. संस्थेकडे कोणतीही वैध नोंदणी नसल्याचे दिसून आल्यानंतर अधिकाऱ्यांनी पंचनामा करून सर्व दस्तऐवज ताब्यात घेतले.
बालकांचे पुनर्वसन👇
संस्थेतील ४९ मुलींना शासकीय मुलींची आश्रमशाळा, खमनचेरू (ता.अहेरी) येथे आणि ४२ मुलांना एकलव्य आश्रमशाळा,अहेरी येथे दाखल करण्यात आले.ही कारवाई अहेरी पोलिस स्टेशनच्या सहकार्याने करण्यात आली असून बालकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे.
सदर प्रकरणाबाबत बाल कल्याण समिती आणि जिल्हा बाल संरक्षण एकक यांची संयुक्त बैठक उद्या, बुधवार ५ नोव्हेंबर रोजी सकाळी अहेरी येथे आयोजित करण्यात आली आहे.त्यावेळी सर्व बालकांना समितीसमोर सादर करण्यात येईल.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू यांनी सांगितले की, “बालकांच्या संरक्षणासाठी आणि कायदेशीर अंमलबजावणीसाठी अशा अनधिकृत संस्थांवर कठोर कारवाई केली जाणार असून प्रत्येक तालुक्यात सर्वेक्षण सुरू आहे.”
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!