Sunday, April 19, 2026
Homeगडचिरोलीशेतकरी उत्पादक कंपन्यांना कायदेशीर मार्गदर्शन..

शेतकरी उत्पादक कंपन्यांना कायदेशीर मार्गदर्शन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन(स्मार्ट)प्रकल्पांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना व्यवसाय सुरू करतांना येणाऱ्या कायदेशीर अडचणींचे निराकरण करण्यासाठी आज,गुरुवार ३० ऑक्टोंबरला मार्गदर्शनपर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.सदर कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा प्रीति हिरळकर,नोडल अधिकारी स्मार्ट प्रकल्प अर्चना राऊत कोचरे,कृषि उपसंचालक आत्मा धर्मेंद्र गिरिपुंजे,महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानाचे प्रफुल्ल भोपये तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून चार्टर्ड अकाऊंटंट  समीर मस्के आणि पॅलॅडियम संस्था विभागीय अंमलबजावणी कक्ष नागपूर येथील कृषी सहयोगी (Agriculture Associate)निखिल कोळी यांनी मार्गदर्शन केले.
या चर्चासत्रात स्मार्ट प्रकल्पांतर्गत मंजूर झालेल्या कृषि विभाग,उमेद आणि मावीम यांच्या शेतकरी उत्पादक कंपनींचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात विविध कायदेशीर बाबींची,लेखा-पद्धती,कर-नियम,संस्थेची नोंदणी,लेखापरीक्षण, तसेच शाश्वत व्यवसाय नियोजन या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्मार्ट प्रकल्पाचे अर्थशास्त्र व वित्तीय प्रवेश सल्लागार कैलास शहारे यांनी केले. त्यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांना तांत्रिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून सातत्याने पाठबळ दिले जाईल,असे सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एम.आया.एस.तज्ञ राहुल मदनकर यांनी केले.या चर्चासत्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना कायदेशीर आणि आर्थिक सल्लामसलत मिळाल्याने भविष्यात त्यांचा व्यवसाय अधिक सुयोजित आणि टिकाऊ स्वरूपात पुढे नेण्यास मदत होईल,असे मत सहभागी संचालकांनी व्यक्त केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!